४ तालुक्यांत पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:52 AM2017-09-19T00:52:12+5:302017-09-19T00:52:12+5:30

जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला.

Heavy rains in 4 talukas | ४ तालुक्यांत पावसाची जोरदार हजेरी

४ तालुक्यांत पावसाची जोरदार हजेरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जाफराबाद, जालना, मंठा, भोकरदन, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला होता. परतूर, बदनापूर, अंबड व घनसावंगी तालुक्यात हलका पाऊस झाला.
रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीडतास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला. टाऊन हॉल परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिमंदिर ते सरस्वती भुवन शाळेपर्यंत खोदलेला रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला. अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
दरम्यान, या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाºयावरून पाणी वाहत आहे. सीना नदीही खळखळून वाहत आहे. जालना तालुक्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, सोमवारी सकाळी प्र्राप्त आकडेवारीनुसार जालना तालुक्यात २९. ३८, बदनापूरमध्ये १६. ४०, भोकरदनमध्ये २३.३८, जाफराबादमध्ये ३६.४० परतूरमध्ये १२.६०, मंठ्यात ४९.५०, अंबडमध्ये १.४३, घनसावंगी २.१४ तर परतुरात १२.६० मिलिमीटर पाऊस झाला. अंबड, घनसावंगी , बदनापूर व परतूर तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ५५३.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Heavy rains in 4 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.