सिल्लोड तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी; अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 05:47 PM2021-09-28T17:47:57+5:302021-09-28T17:51:27+5:30
तालुक्यातील भराडी-अंधारी रस्ता गेल्या चार दिवसांपासून नदीला पूर आल्याने बंद आहे.
सिल्लोड: तालुक्यातील अजिंठा, गोळेगाव,आमठाणा, बोरगाव बाजार या चार मंडळात सोमवारी रात्री जोरदार अतिवृष्टी झाली यामुळे अजिंठा अंधारी, उंडणगाव, राहिमाबाद येथील तिन्ही मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झाले. वादळी वारा, व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे पडली, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील जवळपास सर्व नद्याना पूर आला आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतात पाणी साचले आहे.
सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला व मंगळवारी सुद्धा सकाळपासून सततधार सुरू आहे. सोयाबीन पीक पूर्ण हातचे गेले आहे.कपाशीच्या कैऱ्या सडल्या आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तालुक्यातील भराडी-अंधारी रस्ता गेल्या चार दिवसांपासून नदीला पूर आल्याने बंद आहे.पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे.लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली
सर्कल निहाय झालेला पाऊस..
सिल्लोड तालुक्यात झालेला पाऊस असा:-सिल्लोड ४५, भराडी ६०,अंभई ६३, अजिंठा ८५,गोळेगाव ९२,आमठाणा ६७,निल्लोड ४०,बोरगाव बाजार ६५ असा एकूण सरासरी ६४.६२५ मिलिमीटर पाऊस झाला.
'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी
काटवन तलाव फुटण्याच्या मार्गावर...
अंधारी येथील मोहरा रस्त्यावरील काटवन तलाव तुडुंब भरला आहे. जास्त पाऊस झाल्याने तो केव्हाही फुटू शकतो.. त्यामुळे तलावाकाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तलाव फुटू नये म्हणून सांडव्यातून जेसीबीने पाणी काढण्याचे काम युद्ध पातळीवर प्रशासन करत आहे.टाकली ते अंधारी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.कन्नड औरंगाबाद बस यामुळे पुढे न जाता अंधारातून परत गेली आहे.
Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण