मराठवाड्यात ४० मंडळांना अतिवृष्टी; वरूडकाजी, पिसादेवी मंडळात १२३ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:45 PM2024-10-21T17:45:34+5:302024-10-21T17:45:47+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहरात ७० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस बरसला.

Heavy rains in 40 mandals in Marathwada; 123 mm in Waroodkaji, Pisadevi Mandal. more rain than | मराठवाड्यात ४० मंडळांना अतिवृष्टी; वरूडकाजी, पिसादेवी मंडळात १२३ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस

मराठवाड्यात ४० मंडळांना अतिवृष्टी; वरूडकाजी, पिसादेवी मंडळात १२३ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वरूड काजी आणि पिसादेवी या मंडळात १२३ मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहरात ७० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे शहरी भागात झाडे उन्मळून पडण्यासह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले. जालना जिल्ह्यातील १०, लातूर १, नांदेड १०, परभणी २ व हिंगोली जिल्ह्यातील २ मंडळात पावसाने दाणादाण उडविली. विभागात रविवारी सकाळपर्यंत २९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत विभागात ११३ टक्के पाऊस झाला आहे. ६७९ मि. मी. च्या तुलनेत आजवर ८७५ मि. मी. पाऊस झाला आहे.

जिल्हानिहाय झालेला पाऊस
छत्रपती संभाजीनगर- ४५ मि. मी.
जालना- ४४ मि. मी.
बीड- १३ मि. मी.
लातूर- २० मि. मी.
धाराशिव- ९ मि. मी.
नांदेड- ३३ मि. मी.
परभणी- २६ मि. मी.
हिंगोली- ३८ मि. मी.

Web Title: Heavy rains in 40 mandals in Marathwada; 123 mm in Waroodkaji, Pisadevi Mandal. more rain than

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.