विजांच्या कडकडाटात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:25 AM2018-06-10T01:25:50+5:302018-06-10T01:25:50+5:30

शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते.

Heavy rains of rain | विजांच्या कडकडाटात पावसाची जोरदार हजेरी

विजांच्या कडकडाटात पावसाची जोरदार हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देमान्सूनपूर्व पाऊस : कापणी केलेल्या उन्हाळी धानपिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. आज २८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी, वरठी, अड्याळ या परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने १ जूनपासून आतापर्यंत ५२.१ मिमी पावसाची नोंद केली आहे. शुक्रवारला रात्री ९ वाजता पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर रात्री रिमझीम पाऊस आणि पहाटे बंद झाला. परंतु सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला.
या अचानक बरसलेल्या पावसामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकºयांनी धानाची कापणी करून धान शेतात ठेवले होते. ते धान पावसामध्ये भिजल्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे नुकसान लाखांदूर तालुक्यात अधिक प्रमाणात झाले आहे. दरम्यान, पहिल्याच पावसाने पालिकेची पोल खोलली आहे. नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. त्यातील कचरा रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. याचा फटका वाहनचालकांना झाला. मान्सुनपूर्व नाल्यांची सफाई न केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
लाखांदुरात धान पीक पाण्याखाली
लाखांदूर : उन्हाळी धानाची रोवणीनंतर मे, जून महिन्यात कोरड्या पडणाºया विहिरींना यावर्षी बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे धान पीक चांगले आले. परंतु कापणी करून ठेवलेले बहुतांश शेतकºयांचे धान रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कापणीनंतर धानाची मळणी केली त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळणार आहे. उन्हाळी धानाची रोवणी केल्यानंतर धानपिकाला कीडीने ग्रासले होते. अशातच शेतकऱ्यांनी उसनवार आणि व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. सततची नापिकी आणि नैसर्गिक प्रकोपाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी चांगले धानपीक हाती येईल, अशी आशा होती. धान पिकले तर कर्जाचा भार कमी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु लाखांदूर तालुक्यातील काही भागात जलस्तर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. विविध उपाययोजना करून उत्पादन घेतले. मात्र अचानक बरसलेल्या पावसामुळे कापणीसाठी आलेल्या धानाला फटका बसला आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकºयांच्या शेतात कापणीसाठी असलेले उभे धानपिक पाण्याखाली सापडले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहेत.
पालांदूर परिसरात पावसाची रिपरिप
पालांदूर : जिल्ह्यात काही भागात दोन तीन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी पालांदूर परिसरात मात्र अजूनही चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. कृषी केंद्रात शेतकऱ्यांना अपेक्षित बियाणांची टंचाई जाणवत आहे. संकरीत वाणाला मागणी वाढत आहे. ढगाळ वातावणामुळे तापमान कमी झाले आहे. घर दुरूस्तीच्या कामाला गती आली आहे. पावसाच्या जोरदार हजेरीनंतर पेरणीला गती मिळण्याची चिन्हे आहेत. अनुदानावरील बियाणाने शेतकºयाला आधार मिळाला असला तरी बियाणे अपुरे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
खरिपाच्या मशागतीला प्रारंभ
पवनी : यावर्षी खरीपाच्या मशागतीला लवकरच प्रारंभ झाला आहे. मागील काही वर्षांपासून पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. कधी अवर्षन तर कधी दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी होरपळत आहे. दरम्यान यावर्षी तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली तर पीक हाती येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना पावसाने हजेरी लावली आहे. पवनी आणि लाखांदूर या चौरास भागात उन्हाळी धानपिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी हे धानपिक बºयापैकी आले असताना आता पावसाने हजेरी लावल्याने कापनी केलेले धान ओलेचिंब झाले आहे.

Web Title: Heavy rains of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस