शहरात ३ कोटींच्या औषधींवर ‘टाच’

By Admin | Published: March 17, 2016 12:25 AM2016-03-17T00:25:05+5:302016-03-17T00:27:18+5:30

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.

'Heel' on drugs worth Rs. | शहरात ३ कोटींच्या औषधींवर ‘टाच’

शहरात ३ कोटींच्या औषधींवर ‘टाच’

googlenewsNext

औरंगाबाद : फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या तब्बल ३४४ औषधांवर तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. शहरातील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने नोंदणीकृत ३० होलसेलर्स व ६०० किरकोळ औषधी विक्रेत्यांना या औषधी विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी शहरात ३ कोटींपेक्षा अधिक मूल्यांच्या औषधीवर ‘टाच’ आली आहे. उल्लेखनीय म्हणजे औषधी कंपन्यांनी सध्या दुकानदारांना बंदी घातलेल्या औषधींचा साठा तुमच्याकडेच ठेवा, असा सल्लाही दिला आहे. यामुळे औषध विक्रेत्यांना पुढील आदेश येईपर्यंत ही औषधी सांभाळावी लागणार आहेत.
बंदी घातलेल्या ३४४ औषधांमध्ये वेदनाशमक, सर्दी, अंगदुखी, पोटदुखीवरील औषधांचा समावेश आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो. या औषधांच्या अतिमात्रेमुळे विकलांगता येण्याची शक्यता असल्याचे सांगत तज्ज्ञ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांवर बंदी आणली. या बंदीची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजकुमार झाडबुके यांनी मंगळवारी औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नंतर औषधी भवन येथे संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत ३० होलसेलर्सची बैठक घेण्यात आली. शहरातील ६०० विक्रेत्यांच्या मोबाईलवर ३४४ औषधींवर बंदी आणल्याचा मेसेज संघटनेने पाठविला आहे. यासंदर्भात औषधी वितरक भगवानदास काबरा यांनी सांगितले की, होलसेलरने बंदी घातलेली औषधी विक्री बंद केली असून आमच्याकडे किती स्टॉक आहे, त्याची नोंदणी व ती औषधीचे पॅकिंग करणे सुरू केले आहे.
सिडकोतील औषधी विक्रेता गणेश लड्डा यांनी सांगितले की, प्रत्येक किरकोळ विक्रेत्याकडे बंदी घातलेल्या औषधीचा २० ते २५ टक्के साठा आहे. पुढील आदेश आल्यावर आम्ही औषधींचा साठा होलसेलरला पाठवू व ते कंपन्यांना परत पाठवतील. मात्र सध्या आमची रक्कम या औषधीत अडकली आहे.

Web Title: 'Heel' on drugs worth Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.