आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:04 AM2021-07-12T04:04:07+5:302021-07-12T04:04:07+5:30
औरंगाबाद : कोरोनामुळे ज्या घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, ते कुटुंब पूर्णत: कोलमडलेले आहे. अशा कुटुंबांना मदत करण्याच्या भावनेतून ...
औरंगाबाद : कोरोनामुळे ज्या घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, ते कुटुंब पूर्णत: कोलमडलेले आहे. अशा कुटुंबांना मदत करण्याच्या भावनेतून कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, अलका कोरडे यांनी मदतीचा हात व कुटुंबाला हातभार म्हणून मोफत विवाह सोहळ्यास मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत ज्यांना मुलीच्या विवाहासाठी खर्च करणे शक्य नाही अशा कुटुंबास मदत म्हणून कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे शासन नियम पाळून विवाह सोहळा साजरा करण्यात येईल. हे विवाह समारंभ सर्वधर्मीयांसाठी आहेत. हे कार्य या महिन्यात शेवटच्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी करण्यात येत असून जवळपास ११ जणांचे विवाह सोहळे साजरे करण्याचा संकल्प प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे. इच्छुकांनी कुलस्वामिनी मंगल कार्यालय एन-६ सिडको येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, अलका कोरडे यांनी केले आहे.