वर्गणीमधून गरजवंतांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:52 AM2017-09-05T00:52:22+5:302017-09-05T00:52:22+5:30

सारडानगरी भागातील एकदंत गणेश मंडळाने वर्गणीतील रकमेतून गरजूंना मदतीचा हात दिला

A helping hand to the needy from the crowd | वर्गणीमधून गरजवंतांना मदतीचा हात

वर्गणीमधून गरजवंतांना मदतीचा हात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहराच्या सारडानगरी भागातील एकदंत गणेश मंडळाने वर्गणीतील रकमेतून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. तसेच रविवारी आनंद मेळावा भरवून गणेशोत्सवातील उत्साह द्विगुणित केला.
एकदंत गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी आनंद मेळावा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. रक्तदान, गरजूंना मदत आदींचा त्यात समावेश आहे. यावर्षीही जमा झालेल्या वर्गणीतून बीड शहरातील आदिवासी-पारधी समाजातील मुलांना किराणा साहित्य मदत म्हणून दिले. यामुळे त्यांना आधार मिळाला आहे. यापूर्वीही आजोबा गणेश मंडळाची संकल्पना यशस्वी राबविली होती. त्यानंतर महिला पुरुषांना एकत्र करून त्यांच्या हाती मंडळाची सूत्रे देत विविध सामाजिक उपक्रम गतवर्षी राबविल्याचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी सांगितले. यापुढेही आपण अनेक सामाजिक उपक्रम हाती घेणार असल्याचे मंत्री म्हणाले.
कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, सुधीर भोसले, हनुमंत काळे, अक्षय बनसोडे, शुभम कासट, जय बागल, राहुल जैन, ओंकार पंडित, रोहन होमकर, विनय मंत्री, स्वप्नील लोहिया यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: A helping hand to the needy from the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.