शेतकरी कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरू...
By Admin | Published: September 8, 2015 12:28 AM2015-09-08T00:28:05+5:302015-09-08T00:39:01+5:30
औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत.
औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत. इतरांनी दिलेली मदत आम्ही आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही फक्त पोस्टमन आहोत, अशी भूमिका यावेळी नाना पाटेकर यांनी मांडली.
सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी रोख ७७ हजार रुपये जमा झाले. त्याशिवाय अविनाश चौधरी ५० हजार, बद्रीनाथ खेडकर ३० हजार, केशव कुलकर्णी १५ हजार, प्रकाश कुलकर्णी १५ हजार, प्रतिभा मुळे १५ हजार, बी. पी. सूर्यवंशी ५ हजार, सुभाष पल्लेवार ५ हजार आणि पुण्याच्या सिमेंट कंपनीने २ लाख रुपयांचा धनादेश संयोजकांकडे सुपूर्द केला.
मदत कुणाला द्यावी....
सर्व काही सरकारनेच करावे, ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका नाना व मकरंद यांनी तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किमान १५ हजार रुपयांचा निनावी (अकाऊंट पेयी) धनादेश मकरंद किंवा माझ्याकडे पाठवावा, त्यावर मागे मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यापुढे आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचे तीन महिने वगळून उर्वरित ९ महिने हाताला काम दिले पाहिजे, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले. त्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम, राजीव खांडेकर यांच्यासह फाऊंडेशन सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील तब्बल २०० मुलांना शिकविण्याची जबाबदारी श्यामसुंदर कणके यांनी घेतली आहे. काही मुलांच्या आयाही त्यांच्यासोबत आहेत. या मुलांच्या जेवणाचा खर्च भावेश सराफ व चौधरी यांनी आजपासून उचलला.
४जुगलकिशोर तापडिया यांनी एक लाख शेतकऱ्यांचा विमा काढण्याची जबाबदारी घेतली आहे.
४शहरातील काही बालकांनी दहीहंडी न करता त्यांचे राहिलेले पैसे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हाती आणून दिले.
४मंगेश कामटे यांनी १ लाख ५ हजार रुपयांचा धनादेश दिला.