‘एचआयव्ही’ परिपूर्ण माहितीसाठी हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:02 AM2017-11-28T00:02:46+5:302017-11-28T00:03:06+5:30
जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालयातर्फे १ ते १५ डिसेंबर पर्यंत जनजागृती पंधरवडा राबविला जाणार आहे. शिवाय एचआयव्ही बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीसाठी आता एडस हेल्पलाईन टोलफ्री नंबरवर विविध भाषांमध्ये माहिती दिली जात आहे. मनातील शंकेचे निरासन करण्यासाठी हेल्पलाईनवर कोणालाही संपर्क करणे सोपे आहे. हेल्पलाईन नंबरची स्टिकर आता विविध वाहने, सार्वजनिक ठिकाण तसेच शासकीय कार्यालय व बियरबार परिसरात लावण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालयातर्फे १ ते १५ डिसेंबर पर्यंत जनजागृती पंधरवडा राबविला जाणार आहे. शिवाय एचआयव्ही बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीसाठी आता एडस हेल्पलाईन टोलफ्री नंबरवर विविध भाषांमध्ये माहिती दिली जात आहे. मनातील शंकेचे निरासन करण्यासाठी हेल्पलाईनवर कोणालाही संपर्क करणे सोपे आहे. हेल्पलाईन नंबरची स्टिकर आता विविध वाहने, सार्वजनिक ठिकाण तसेच शासकीय कार्यालय व बियरबार परिसरात लावण्यात येणार आहेत.
जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालयाच्या वतीने पंधरवड्या दरम्यान विविध कार्यक्रम, एचआयव्ही जनजागृती संदर्भात मेळावे तसेच रॅली यासह विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. घरेलू कामगार, वाहनचालक, बांधकाम मजूर यांचे मेळावे भरवून एचआयव्ही बाबत तज्ञाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे एडस बद्दल माहितीसाठी सुरू करण्यात आलेल्या टोलफ्री नंबरबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.