आईच्या किंकाळीने स्वातीला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:23 AM2017-08-25T00:23:02+5:302017-08-25T00:23:02+5:30

बहिणीसह आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हलवून पाहिले तर आई-वडील उठले नाहीत, बहिणही बेशुद्धावस्थेत होती, अशा शब्दात काळीज चर्रर्र करणाºया या घटनेची फिर्याद स्वातीने गेवराई पोलीस ठाण्यात दिली

Her mother's voice came in her wake | आईच्या किंकाळीने स्वातीला आली जाग

आईच्या किंकाळीने स्वातीला आली जाग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अभ्यास करून समोरच्या खोलीतील कॉटवर झोपले. झोप लागते ना लागते तोच आईची किंकाळी ऐकली. पाहिले तर बहिणीसह आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हलवून पाहिले तर आई-वडील उठले नाहीत, बहिणही बेशुद्धावस्थेत होती, अशा शब्दात काळीज चर्रर्र करणाºया या घटनेची फिर्याद स्वातीने गेवराई पोलीस ठाण्यात दिली आहे.
हा थरार गेवराई शहरातील गणेश नगर भागातील आदिनाथ घाडगे यांच्या घरातील आहे. अवघ्या १५ ते २० मिनिटांत चोरट्यांनी घाडगे दाम्पत्याची हत्या केली. भवानी बँकेचे वसुली अधिकारी आदिनाथ घाडगे व त्यांच्या पत्नी अलका घाडगे यांची चोरांनी हत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. बाळंतपणासाठी आलेल्या वर्षा संजय जाधव या मोठ्या मुलीला मारहाण करून जखमी केले तर लहान मुलगी म्हणजेच फिर्यादी स्वातीला धमकी देऊन गप्प बसविण्यात आले. अवघ्या १५ ते २० मिनिटांतील हा थरार काळीज हेलावणारा आहे. आदिनाथ घाडगे यांची स्वाती ही मुलगी. तिचा भाऊ चंद्रशेखर हा शिक्षणानिमित्त चाळीसगावला होता.
स्वातीने फिर्यादीत म्हटले की, मंगळवारी रात्री आठ वाजता आम्ही सर्वांनी सोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊ वाजता आई-वडील घरातील समोरच्या हॉलमध्ये झोपले व बहिण वर्षा ही तिच्या बाळासह पाठिमागच्या खोलीत झोपली. सगळे झोपल्यानंतर मी किचन रुममध्ये बसून अभ्यास केला. रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास केला. तेथून उठून समोरच्या हॉलमध्ये जाऊन झोपले. झोप लागते ना लागते तोच मला आईच्या किंचाळण्याचा आवाज आला. मला जाग आली. घराचा दरवाजा उघडा दिसला. दोन अनोळखी व्यक्ती घरात आले होते. मला जाग येण्यापूर्वीच त्यांनी आई-वडीलांना मारले होते तर बहिणीला गंभीर जखमी केले होते. दोघांपैकी एकाच्या हातात कुºहाड होती. त्यांनी मला ‘आवाज करू नकोस, शांत रहा’ अशी धमकी दिली. कपाटाच्या चाव्या मागतिल्या, कॅश कोठे ठेवली आहे, असे विचारले. मी नाही म्हणाल्यावर त्यांनी मला झोप म्हणून तोंडावर पांघरून टाकले. त्यांनतर त्यांनी घरातील कपाट इतर साहित्याची उचकापाचक करून बाहेरच्या खोलीत गेले. बाहेरील खोलीतही उचकापाचक करीत असल्याचा आवाज येत होता.
पंधरा ते वीस मिनिटानंतर आवाज बंद झाल्याने मी उठून आई-वडिलांकडे धावल्याचे स्वातीने गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Her mother's voice came in her wake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.