निलगायींच्या कळपाने मका केला फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:06 AM2021-02-11T04:06:51+5:302021-02-11T04:06:51+5:30
सोयगाव : कापणी करून काढणीसाठी ठेवलेल्या मक्यावर निलगायींच्या कळपाने ताव मारला आहे. यात सोनसवाडी येथील महिला शेतकऱ्याचे २५ हजार ...
सोयगाव : कापणी करून काढणीसाठी ठेवलेल्या मक्यावर निलगायींच्या कळपाने ताव मारला आहे. यात सोनसवाडी येथील महिला शेतकऱ्याचे २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. या घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे.
सोयगावच्या सोनसवाडी शिवारातील गट क्रमांक-१०३ मध्ये महिला शेतकरी सुनंदाबाई सोहनी यांनी चार एकर क्षेत्रावर रब्बी मक्याची लागवड केली. या मक्याची कापणी करून काढणीसाठी शेतातच वाळत सोडली होती. मंगळवारी रात्री निलगायींच्या कळपाने या मकावर चांगलाच ताव मारुन फस्त केली. यामध्ये सुनंदाबाई यांचे नुकसान झाले आहे. सोयगाव शिवारात रब्बीची पिके निलगायींचे कळप नष्ट करीत आहेत. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी अरुण सोहनी यांनी केली आहे.