एमजीएमतर्फे १0 डिसेंबरला हेरिटेज रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:45 AM2017-12-03T00:45:50+5:302017-12-03T00:46:06+5:30

युनोस्कोने जाहीर केलेले जागतिक स्मारक व पुरातन संपत्तीच्या संवर्धनासाठीची जागरुकता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी मिशनतर्फे त्यांच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त १0 डिसेंबर रोजी हेरिटेज रनचे आयोजन करण्यात आले आहे.

Heritage run by MGM on 10th December | एमजीएमतर्फे १0 डिसेंबरला हेरिटेज रन

एमजीएमतर्फे १0 डिसेंबरला हेरिटेज रन

googlenewsNext

औरंगाबाद : युनोस्कोने जाहीर केलेले जागतिक स्मारक व पुरातन संपत्तीच्या संवर्धनासाठीची जागरुकता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी मिशनतर्फे त्यांच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त १0 डिसेंबर रोजी हेरिटेज रनचे आयोजन करण्यात आले आहे. या हेरिटेज रनचे उद्घाटन १0 डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.
ही हेरिटेज रन मुलांच्या १६ वर्षांखालील गटासाठी ५ कि. मी., ३५ वर्षांखालील गटासाठी १२ कि. मी., ४५ वयोगटाखालील गटासाठी ५ कि. मी., ५५ वयोगटासाठी ३ कि. मी. व ५६ पुढील वयोगटासाठी २ कि. मी. अंतराची असणार आहे. महिला गटात १६ वर्षांखालील वयोगटासाठी ५ कि. मी., ३५ वर्षांखालील वयोगटासाठी ७ कि. मी., ४५ वयोगटाखालील गटासाठी ३ कि. मी., ५५ वयोगटाखालील गटासाठी २ कि. मी. आणि ५६ पेक्षा जास्त वयोगटासाठी २ कि. मी. अंतर ठेवण्यात आले आहे. नाव नोंदणी क्रमांक देण्यासाठी ९ डिसेंबर रोजी एमजीएम व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दुपारी १ ते ५ या वेळेत विशेष शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
या हेरिटेज रनला एमजीएम स्पोर्ट येथून सकाळी ७ वाजता प्रारंभ होईल. हेरिटेज रनचा मार्ग हा एमजीएम स्पोर्ट स्टेडियम, आझाद चौक, टी. व्ही. सेंटर, डॉ. सलीम अली सरोवर, जिल्हाधिकारी कार्यालय, रंगीन दरवाजा, नौबत दरवाजा व परतीचा मार्ग हा नौबत दरवाजा, जिल्हाधिकारी कार्यालय बस स्टॉप, दिल्ली गेट, सलीम अली सरोवर, हिमायतबाग, बस स्टॉप, टी. व्ही. सेंटर, आझाद चौक व एमजीएम येथे समारोप होईल. या हेरिटेज रनसाठी १ लाख ३0 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील धावपटूंनाही व्यासपीठ मिळावे हादेखील या हेरिटेज रनचा हेतू असल्याचे डॉ. आशिष गाडेकर यांनी सांगितले. या हेरिटेज रननिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. आशिष गाडेकर यांच्यासह डॉ. कर्नल प्रदीपकुमार उपस्थित होते. या स्पर्धेची नोंदणी मनीष पोलकम यांच्याकडे करता येईल. त्याचप्रमाणे आॅनलाइन नोंदणी ६६६.ेॅेँी१्र३ँी१४ल्ल.ङ्म१ॅ या संकेत स्थळावर करता येईल.

Web Title: Heritage run by MGM on 10th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.