शहागंजमध्ये हेरिटेज वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:53 PM2017-11-12T23:53:01+5:302017-11-12T23:53:04+5:30
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे नियमितपणे आयोजित केला जाणारा हेरिटेज वॉक रविवारी शहागंज भागातील ऐतिहासिक मशिदीसह इतर वास्तूंमध्ये उत्साहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे नियमितपणे आयोजित केला जाणारा हेरिटेज वॉक रविवारी शहागंज भागातील ऐतिहासिक मशिदीसह इतर वास्तूंमध्ये उत्साहात पार पडला. या हेरिटेज वॉकला इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे शहरातील ऐतिहासिक वास्तूची माहिती सर्वसामान्य नागरिकांना, इतिहासप्रेमी व्हावी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागावा या हेतूने प्रत्येक पंधरा दिवसांनी हेरिटेज वॉकचे आयोजन केले जाते. या रविवारी निजामाचा वजीर मलिक अंबरने वसवलेल्या ऐतिहासिक शहागंज परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. चमनमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपुतळ्यापासून सकाळी साडेसातला वॉक सुरुवात झाली. याठिकाणी शहागंजच्या ऐतिहासिकत्वाची माहिती रफत कुरेशी आणि डॉ. दुलारी कुरेशी यांनी दिली. शाही मशीद, घड्याळीचा मनोरा, सब्जीमंडी आणि चमन परिसराचा इतिहास नागरिकांनी जाणून घेतला. या हेरिटेज वॉकमध्ये रफत कुरेशी, डॉ. दुल्हारी कुरेशी, डॉ. बिना सेंगर, अॅड. स्वप्नील जोशी, नीलिमा मार्कंडेय, तेजस्विनी आफळे, डॉ. कामाजी डक यांच्यासह इतिहासप्रेमी उपस्थित होते.