हर्सूल तलाव कधीही होऊ शकतो 'ओव्हरफ्लो'; खाम नदीपात्रातील खड्डे बुजविणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:17 PM2020-08-03T19:17:21+5:302020-08-03T19:24:29+5:30

महापालिकांने खाम नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील नागरिकांना स्वत:हून स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.

Hersul Lake can be 'overflow' at any time; continues to fill the pits in the Kham river basin | हर्सूल तलाव कधीही होऊ शकतो 'ओव्हरफ्लो'; खाम नदीपात्रातील खड्डे बुजविणे सुरू

हर्सूल तलाव कधीही होऊ शकतो 'ओव्हरफ्लो'; खाम नदीपात्रातील खड्डे बुजविणे सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देजलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरूतलाव भरण्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा

औरंगाबाद : ऐतिहासिक हर्सूल तलाव भरण्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांमध्ये तलावाची पाणीपातळी फक्त दोन इंचांनी वाढली. २८ फूट पाणीपातळी झाल्यावर तलावातील पाणी खाम नदीपात्रातून वाहते.  पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा म्हणून रविवारी महापालिकेने पात्रातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. तत्पूर्वी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी  पाणीपातळीचा आढावा घेतला.

महापालिकांने शनिवारी रात्री भोंगे लावून खाम नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील नागरिकांना स्वत:हून स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. १४ वर्षांपूर्वी नदीपात्रात मोठा पूर आल्याने महापालिकेने नागरिकांना स्थलांतरित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठे स्थलांतरित व्हावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. तलावाची पातळी शनिवारी रात्री वाढली नाही. मात्र, महापालिकेने रविवारी सकाळपासून पात्रातील खड्डे बुजविणे सुरू केले. पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा हा उद्देश असल्याचे कार्यकारी अभियंता धांडे यांनी सांगितले. हर्सूल तलाव ओसंडून वाहणार, असे भाकीत महापालिकेने केले होते. त्यामुळे शेकडो नागरिक रविवारी  तलावाच्या पात्राजवळ गेले. दोन फुटांनी पाणी  वाढल्यावर पात्रात पडेल, असे उपअभियंता अशोक पद्मे यांनी सांगितले.

जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू
पावसाळ्याला अजून दोन महिने शिल्लक आहेत. दोन महिने तलावातील पाणी नदीपात्रात वाहून जाईल. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तलावातील पाण्याचा वापर करून नागरिकांना पिण्यासाठी करता यावा म्हणून आज युद्धपातळीवर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू केले. विद्युत विभागाचे थोडेसे काम बाकी आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी ट्रायल घेण्याचे काम महापालिकेने आजपासून सुरू केले. तलावातून दररोज तीन ते चार एमएलडी पाण्याचा उपसा सहजपणे करता येऊ शकतो. जुन्या शहरातील तब्बल १८ वॉर्डांना पाणीपुरवठा करता येऊ शकतो. सध्या १ लाख ८० हजार नागरिकांना जायकवाडीचे पाणी देण्यात येत आहे. हर्सूल तलावाचे पाणी उपलब्ध झाल्यास जायकवाडीवरील ताण बराच हलका होणार आहे.

Web Title: Hersul Lake can be 'overflow' at any time; continues to fill the pits in the Kham river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.