औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये
By नजीर शेख | Published: April 23, 2024 08:06 PM2024-04-23T20:06:08+5:302024-04-23T20:06:27+5:30
१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे १९९९ मध्ये झाले आहे. त्यावेळी ६६.०६ टक्के इतके मतदान झाले हाेते.
१९७१ निवडणुकीपासूनचा औरंगाबाद मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता, सर्वात कमी मतदान हे १९८० मध्ये झालेले आढळून येते. त्यावेळी केवळ ४५.८ टक्के मतदान झाले आहे, म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी आपला लोकप्रतिनिधी निवडला असल्याचे दिसते. सर्वाधिक मतदान झालेले असताना, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे निवडून आले आहेत. खैरे यांना सुमारे ५२ टक्के मते मिळाली. सर्वात कमी मतदान झालेले असताना, काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले आहेत. अर्थात या ४५.८ टक्के मतदानातही काझी सलीम यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यांना ५०.५१ टक्के मते मिळाली होती.
१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले. यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले, तर खैरे यांचा निसटता पराभव झाला. १९८० आणि १९९१ (४८.३७) अशा दोन निवडणुकांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.
१९७१ पासूनच्या निवडणुकीतील मतदान
वर्ष टक्के मतदान
१९७१ ५२.६६
१९७७ ५६.१७
१९८० ४५.८
१९८४ ५८.७८
१९८९ ५९.९४
१९९१ ४८.३७
१९९६ ५२.८९
१९९८ ६१.४
१९९९ ६६.०६
२००४ ५४.३०
२००९ ५१.५६
२०१४ ६१.८५
२०१९ ६३.४८