मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
By Admin | Published: September 20, 2016 12:16 AM2016-09-20T00:16:02+5:302016-09-20T00:21:46+5:30
औरंगाबाद : हवामान खात्याने या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
औरंगाबाद : हवामान खात्याने या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एमजीएम खगोलशास्त्र विभागप्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, २१ व २२ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होण्याचे संकेत सध्याच्या वातावरणावरून दिसत आहे. मुंबई ते औरंगाबाद या पट्ट्यात जोरदार पाऊस होईल. तसेच धुळे, जळगाव, अहमदनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अमरावती या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. बीडमध्ये बऱ्यापैकी तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस झाला. सायंकाळी ढगाळ वातावरण होते.