शहरात ‘नो एंट्री’मध्ये हायवा व ट्रक सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:02 AM2021-03-04T04:02:41+5:302021-03-04T04:02:41+5:30

शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज नवीन वाहनांची यात भर पडते आहे. मात्र, शहरातील रस्ते ‘जैसे थे’ आहेत. ...

Highways and trucks in the city 'No Entry' | शहरात ‘नो एंट्री’मध्ये हायवा व ट्रक सुसाट

शहरात ‘नो एंट्री’मध्ये हायवा व ट्रक सुसाट

googlenewsNext

शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज नवीन वाहनांची यात भर पडते आहे. मात्र, शहरातील रस्ते ‘जैसे थे’ आहेत. परिणामी अपघात आणि वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. जडवाहनांमुळे बायपासवर सतत होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. या घटना रोखण्यासाठी अवजड वाहने, काळीपिवळी जीप आणि खासगी ट्रॅव्हल बसला शहरात सकाळी ७ ते रात्री ११पर्यंत प्रवेश बंदी आहे. याबाबतच्या वेगवेगळ्या अधिसू्चना शहर वाहतूक विभागाने काढल्या आहेत. या अधिसू्चनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. यानुसार शहराच्या प्रवेशद्वारावर जड वाहनांना प्रवेश बंदीचे फलक लावले आहेत. शिवाय विविध रस्ते आणि चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. असे असूनही विशेषकरून वाळू आणि अन्य साहित्याची वाहतूक करणारी वाहने शहरातून सुसाट धावताना दिसतात. सोमवारी लोकमत प्रतिनिधीने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले.

जड वाहनांमुळे अपघाताचा धोका असतो, हे सर्वश्रूत आहे. असे असूनही शहराच्या नाक्यावरच ही वाहने का अडविली जात नाहीत? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

===========

या मार्गावर धावताना दिसतात अवजड वाहने

शहरात येणारी बहुतेक वाळू तापी आणि गिरणा नदीपात्रातून येते. याशिवाय चोरटी वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक भोकरदन, सिल्लोड तालुक्यातून येतात. गंगापूर तालुक्यातील वाळूचे ट्रक वाळूज मार्गे शहरात येतात. बायपासकडून शहरात येणाऱ्या हायवा ट्रकची संख्या कमी आहे.

========

जटवाडा रोडकडून शहरात प्रवेश करणारी जड वाहने पोलिसांना चुकविण्यासाठी हडको कॉर्नर मार्गे टी. व्ही. सेंटरकडून किराडपुरा येथील वाळू ठिय्यावर जातात. तसेच गारखेडा, पुंडलिकनगर परिसरातील वाळू ठिय्यावरही सकाळी ९ वाजण्याच्या आत ट्रक रिकामे होतात आणि परतीच्या मार्गाला लागतात.

=================== पॅकबंद ट्रकमध्ये वाळू

मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये वाळू भरून आणली जाते. ट्रकला ताडपत्री लावून ती झाकली जाते.

==================

वाहतूक चौकात आणि नाक्यावर वाहतूक पोलीस सकाळी ९ वाजता हजर असतात आणि रात्री ९ वाजेपर्यंत ते तेथे असतात. ही बाब लक्षात घेऊन काही वाहनचालक रात्री ९.३० नंतर आणि सकाळी ९ पूर्वी माल वाहतूक करतात.

==============

कोट

शहरातील विविध रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांचे मिक्सर, ट्रक आणि डंपर अशा वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय काही खासगी ट्रॅव्हलच्या लग्नाच्या बसलाही परवानगी देण्यात आली आहे.

= मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक विभाग.

Web Title: Highways and trucks in the city 'No Entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.