हिंगोलीची भाजी मंडई अस्वच्छतेच्या विळख्यात
By Admin | Published: July 11, 2017 11:42 PM2017-07-11T23:42:03+5:302017-07-11T23:45:40+5:30
हिाी : येथील भाजीमंडई मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिाी : येथील भाजीमंडई मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. शिवाय आवश्यक सुविधाही नसल्याने भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. येथील सुविधेकडे मात्र पालिका दुर्लक्ष करीत आहे.
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली शहरातील भाजीमंडईत आवश्यक सुविधा नाहीत. पालिका प्रशासनही याकडे मात्र गांभीर्याने लक्ष देत नाही. परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी नसल्यामुळे ओला व सुका कचरा उघड्यावरच फेकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना ओटेही नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेते खाली बसूनच भाजीपाला विकतात.
जनावरांचा मुक्त संचार
भाजीमंडई परिसरात जनावरांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे जनावरे अनेकदा अंगावर धावून येत आल्याचेही ग्राहकांतून सांगितले जात होते. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे तितकेच महत्वाचे आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यातील पॉलिथिन जनावरांच्या पोटात जाते. त्यामुळे भाजीमंडईत कचराकुंडी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. शिवाय येथील आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास विक्रेते व नागरिकांची गैरसोय टळेल. परंतु वारंवार पाहणी करूनही अधिकारी काहीच करीत नाहीत.