हिंगोलीत १३ बटूंवर उपनयन संस्कार

By Admin | Published: March 20, 2016 11:21 PM2016-03-20T23:21:52+5:302016-03-20T23:29:03+5:30

हिंगोली : श्री वासुदेव दत्तात्रय पादुका व श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे २० मार्च रोजी १३ बटंूवर सामूहिक उपनयन संस्कार पार पडले. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Hingoliat 13 Batuuna Upaniyan Sanskar | हिंगोलीत १३ बटूंवर उपनयन संस्कार

हिंगोलीत १३ बटूंवर उपनयन संस्कार

googlenewsNext

हिंगोली : श्री वासुदेव दत्तात्रय पादुका व श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे २० मार्च रोजी १३ बटंूवर सामूहिक उपनयन संस्कार पार पडले. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
मागील सात वर्षांपासून मोफत सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी २० मार्च रोजी १३ बटुंची नाव नोंदणी झाली होती. ज्यामध्ये रोहीत संजोक पाठक (रा.देवगल्ली हिंगोली), योगेश नंदकिशोर जोशी (रा.लहान मारोती मंदिर, हिंगोली), ओंकार गोविंदराव जोशी (रा.दलालवाडा हिंगोली) आशिष अनिल बापट (चारठाणा), वैभव गजानन गुंजकर, अभिनय गजानन गुंजकर (रा.मसोड), मधुसूदन रंगनाथराव दंडे, यश रंगनाथ दंडे (रा.वसमत), स्वप्निल सुनील वैद्य (रा. नांदेड), सार्थक गणेश सादेकर, कार्तिक विष्णू पांडे, महेश विष्णू पांडे (कुंडकर पिंपरी), कृष्णकांत जनार्धन चुनघरे (कानडखेडा) यांचा समावेश होता.
सकाळी १०.४५ वाजता १३ बटूंवर विविधरित्या सामूहिक उपनयन संस्कार सोहळा पार पडला. सनई चौघड्यांच्या सुरात उपनयन संस्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेकांनी हजेरी लावली. सोहळ्याकरिता श्री दत्त सेवा समिती मंगळवारा यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Hingoliat 13 Batuuna Upaniyan Sanskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.