हिंगोलीचा सोलापूरवर दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:53 AM2018-04-04T00:53:33+5:302018-04-04T00:55:02+5:30
अनुभवी खेळाडू सन्नी पंडित याची जादुई फिरकी गोलंदाजी आणि सत्यजित नायक व संदीप पाटील यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर हिंगोली संघाने पुणे येथे एमसीएच्या सिनिअर साखळी क्रिकेट स्पर्धेत पुणे येथील लढतीत सोलापूर संघावर एक डाव आणि १६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सन्नी पंडितने या सामन्यात ९५ धावांत एकूण ११ गडी बाद केले.
औरंगाबाद : अनुभवी खेळाडू सन्नी पंडित याची जादुई फिरकी गोलंदाजी आणि सत्यजित नायक व संदीप पाटील यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर हिंगोली संघाने पुणे येथे एमसीएच्या सिनिअर साखळी क्रिकेट स्पर्धेत पुणे येथील लढतीत सोलापूर संघावर एक डाव आणि १६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सन्नी पंडितने या सामन्यात ९५ धावांत एकूण ११ गडी बाद केले.
सत्यजित नायक याची भेदक गोलंदाजी आणि सन्नी पंडितच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर हिंगोलीने सोलापूरचा पहिला डाव १३८ धावांत गुंडाळला. सोलापूरकडून अक्षय हवाले याने सर्वाधिक १९ धावा केल्या. सत्यजित नायक याने ५९ धावांत ४ गडी बाद केले. त्याला सन्नी पंडितने ४० धावांत ४ गडी बाद करीत साथ दिली. ज्ञानेश्वर शिंदे व एस. खांडेगावकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर हिंगोलीने पहिल्या डावात २९३ धावा करीत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यांच्याकडून हर्षद मेहेरने ९१, संदीप पाटीलने ५७ व संदेश पटीलने ३७ धावांचे योगदान दिले. सोलपूरकडून झेद उस्ताद याने ८६ धावांत ५ गडी बाद केले. पहिल्या डावात १५५ धावांनी पिछाडीवर पडलेला सोलापूरचा संघ सन्नी पंडितच्या जादुई गोलंदाजीसमोर दुसºया डावात १३९ धावांत ढेपाळला. सोलापूरकडून दुसºया डावात शहानूर नदाफ याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. सन्नी पंडितने दुसºया डावात ५५ धावंत ६ गडी बाद केले. त्याला अभिनव कांबळेने २ व सत्यजित नायकने १ गडी बाद करीत साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
सोलापूर : पहिला डाव : १३८. (अक्षय हवाले १९, सत्यजित नायक ५/५९, सन्नी पंडित ४/४०). दुसरा डाव : १३९. (शहानूर नदाफ ४२. सन्नी पंडित ६/५५, अभिजित कांबळे २/२६, सत्यजित नायक १/२९).
हिंगोली (पहिला डाव) : ५५.१ षटकांत सर्वबाद २९३. (हर्षद मेहेर ९१, संदीप पाटील ५७, संदेश पाटील ३७, स्वप्नील इंगळे २४, ज्ञानेश्वर शिंदे २१. झैद उस्ताद ५/८६).