हिंगोलीत बाप्पांचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:38 AM2017-08-26T00:38:52+5:302017-08-26T00:38:52+5:30

शहरात गणेशाच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत होती. शहरातील गांधी चौक भाग तर गर्दीने फुलून गेला होता. श्री विघ्नहर्ता चिंतामणी गपणतीची मिरवणूकही लक्षवेधी ठरली.

Hingolit Bapko strongly welcome | हिंगोलीत बाप्पांचे जोरदार स्वागत

हिंगोलीत बाप्पांचे जोरदार स्वागत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात गणेशाच्या स्वागतासाठी आज सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत होती. शहरातील गांधी चौक भाग तर गर्दीने फुलून गेला होता. श्री विघ्नहर्ता चिंतामणी गपणतीची मिरवणूकही लक्षवेधी ठरली.
हिंगोलीत यंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा होत आहे. ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळांनी सकाळी दहा वाजेपासूनच बाजारात गर्दी केली होती. मूर्ती खरेदी करून वाहनांत टाकून नेली जात होती. विशेषत: बच्चेकंपनीही घरी बाप्पांची स्थापना करण्यासाठी मूर्ती खरेदी करताना दिसून येत होती. विविध आकारातील लक्षवेधी मूर्ती उपलब्ध होत्या. त्यातच काहींनी तर आधीच मूर्ती निवडून ठेवली होती. आज ती वाहनाने नेण्याची तजविज केली होती. शंभर रुपयांपासून ते हजारोंच्या मूर्ती उपलब्ध होत्या. शाडूच्या मातीच्या मूर्तीही काहींनी खरेदी केल्या. दिवसभर शहरातील विविध भागात ढोल-ताशे, डीजेसह गणपती बाप्पा मोरया... चा गजर ऐकायला मिळत होता. रात्री दहा वाजेपर्यंत एक झाली की, दुसरी मिरवणूक निघत होती.
विघ्नहर्ता चिंतामणीची पालखी
शासकीय विश्रामगृह परिसरातून दुपारी १२ वाजता श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पोस्ट आॅफिस रोड, जवाहर रोड मार्गे ते मंदिराकडे गेली. यात पालखीसोबत भजनीमंडळ, घोडेही होते. वारकरी मंडळीतील बच्चेकंपनींचा सहभाग लक्षवेधी ठरणारा होता. महाप्रसादाचेही वाटपच सोबत केले जात होते. अनेकांनी यात सहभाग नोंदविला.

Web Title: Hingolit Bapko strongly welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.