जेलमधून सुटल्यावर गांजाविक्री करणारा रंगेहात पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:26+5:302021-01-17T04:05:26+5:30

औरंगाबाद : गुरुवारी रात्री गुन्हेशाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी ५७ किलो गांजा जप्त केल्याची कारवाईला २४ तास होण्यापूर्वीच मुकुंदवाडी ...

On his release from jail, he was caught red-handed selling marijuana | जेलमधून सुटल्यावर गांजाविक्री करणारा रंगेहात पकडला

जेलमधून सुटल्यावर गांजाविक्री करणारा रंगेहात पकडला

googlenewsNext

औरंगाबाद : गुरुवारी रात्री गुन्हेशाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी ५७ किलो गांजा जप्त केल्याची कारवाईला २४ तास होण्यापूर्वीच मुकुंदवाडी पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीला गांजा विक्री करताना शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५ हजार ५०० रुपयांचा ८७५ग्रॅम गांजा जप्त केला. ज्ञानेश्वर मनोहर यादव (रा . जयभवानीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर वर्षभरापूर्वी पोलीस आयुक्तांनी एमपीडीएची कारवाई करून हर्सूल जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. तो नुकताच जेलमधून बाहेर आला होता. यादव हा चोरट्या मार्गाने गांजा विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून शुक्रवारी रात्री मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली. यानंतर, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली असता, आरोपी गांजा विक्री सुरू केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन आरोपीच्या घराचा परिसर गाठला. तेव्हा मैदानाजवळ तो एक गोणी हातात घेऊन उभा दिसला. पोलिसांनी त्याची झडती घेण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने तयारी दर्शविल्यावर त्याच्याजवळील गोणीची झडती घेतली असता, त्यात गांजाच्या १७५ प्लास्टीक पिशवीच्या पुड्या आढळून आल्या. या गांजाचे वजन केले असता, ते ८७५ ग्रॅम असल्याचे समोर आले. या प्रकरणी फौजदार अमोल म्हस्के यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात यादव विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

Web Title: On his release from jail, he was caught red-handed selling marijuana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.