मध्यस्थी करण्यास गेलेल्या दाम्पत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:56 PM2019-06-05T22:56:50+5:302019-06-05T22:57:02+5:30
मुलगा व शेजाऱ्याचे यांच्यात सुरु असलेले भांडण सोडवायला गेलेल्या दाम्पत्याला एकाने मारहाण केली.
वाळूज महानगर : मुलगा व शेजाऱ्याचे यांच्यात सुरु असलेले भांडण सोडवायला गेलेल्या दाम्पत्याला एकाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.४) रात्री बजाजनगर येथे घडली.
रामकृष्ण सखाराम मोरे (६०) हे पत्नी चंदाबाई व मुलगा विकाससह बजाजनगर येथे राहतात. शेजारी गणेश शिंदे राहतो. मंगळवारी रात्री १० वाजता पती-पत्नी जेवण करीत असताना घरासमोर गणेश शिंदे हा विकासला मारहाण करीत होता.
त्यामुळे रामकृष्ण व चंदाबाई भांडण सोडविण्यासाठी गेले. शिंदे याने या दोघांनाही मारहाण केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गणेश शिंदे याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.