छत्रपती संभाजीनगरातील कुख्यात २,६३९ गुन्हेगारांची हिटलिस्ट तयार
By सुमित डोळे | Published: February 15, 2024 07:42 PM2024-02-15T19:42:47+5:302024-02-15T19:45:25+5:30
प्रत्येकाला भाऊ, दादा बनायचे असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार मात्र पोलिसांसाठी आव्हान बनत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या ३ वर्षांमध्ये लूटमार, प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांचा आलेख चढताच राहिला. रस्त्यावर अडवून मारहाण करणे, लुटणे यासह गल्ली-बोळांमधील गावगुंड, सार्वजनिक ठिकाणी जमा होणारे टवाळखोर दिवसेंदिवस अधिक प्रमाणात निर्माण होत गेले. प्रत्येकाला भाऊ, दादा बनायचे असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार मात्र पोलिसांसाठी आव्हान बनत आहेत. परंतु, शहर पोलिसांनी देखील यावर कठोर भूमिका घेत पोलिसी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील लहान-मोठ्या १४ हजार ७४० गुन्हेगारांच्या यादीतील २ हजार ६३९ गुन्हेगारांवर करडी नजर असून, दिसेल तेथून ताब्यात घेत त्यांचा पोलिसांच्या पारंपरिक पद्धतीने ‘यथेच्छ सत्कार’ करण्याचे ठरवले आहे.
२०५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
शहरात एकूण २६०० पेक्षा अधिक टवाळखोर, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी गुन्हे शाखेकडून हिस्ट्री शिटर यादीतील २०५ जणांवर कारवाई केली.
फरार आरोपींना अटक-६४
कलम ११० / ११० सीआपीसी-५४
प्रतिबंधात्मक कारवाई-२०५
शरीरविषयक गुन्ह्यांमध्ये वाढ
वर्ष खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी
२०२३ २९ १०७ १८४
२०२२ ४३ ४८ ११९
२०२१ ३५ ४७ ११४
पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या प्रयत्नांमुळे २०२३ मध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक गुन्हेगारांना एमपीडीएची कारवाई करुन स्थानबद्ध करण्यात आले. त्यामुळे अनेक कुख्यात गुन्हेगार कारागृहात अडकून पडले.
२०२० - ७
२०२१ - १०
२०२२ -९
२०२३ - १८
पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गेल्या दीड वर्षामध्ये जिल्ह्यात प्रथमच एमपीडीएच्या कारवाईला वेग दिला. परिणामी, जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या मालिकेला पायबंद बसला.
कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार हद्दपार
वर्ष --- गुन्हेगार
२०२२--- ४४
२०२३ ---- ४६
एमपीडीए कारवाई
वर्ष --- गुन्हेगार
२०२२ --- ५
२०२३ --- ७