ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस जोपासतात छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:05 AM2021-05-09T04:05:02+5:302021-05-09T04:05:02+5:30

कडक उन्हामुळे जिवाची होणारी तगमग आणि कारवाई करताना हुज्जत घालणाऱ्यांची समजूत काढताना पोलिसांच्या ताणतणावात भर पडताना दिसते. अशा ...

Hobbies are cultivated by the police to control stress | ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस जोपासतात छंद

ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस जोपासतात छंद

googlenewsNext

कडक उन्हामुळे जिवाची होणारी तगमग आणि कारवाई करताना हुज्जत घालणाऱ्यांची समजूत काढताना पोलिसांच्या ताणतणावात भर पडताना दिसते. अशा परिस्थितीत काही पोलीस दररोज सकाळी नियमित भजन म्हणून तर कोणी गाणे गाऊन तणाव हलका करण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण दररोज व्यायामाला प्राधान्य देऊन तणावावर मात करतात.

शहर पोलीस दलात अशी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत की, त्यांना आध्यात्माची आवड आहे. तर काही जण उत्तम गायक आहेत. हे पोलीस कर्मचारी दैनंदिन काम करताना सोबत काम करणाऱ्या पोलिसांनाही तणावमुक्त राहण्यासाठी प्रेरणा देतात.

===================

शहर वाहतूक शाखेत कार्यरत हवालदार बी. के. चौरे ऊर्फ महाराज हे त्यांच्यापैकी एक आहेत. वारकरी घराण्याचा वारसा असलेले चौरे हे उत्तम कीर्तनकार आहेत. जिंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोशनगेट येथे ते सध्या अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी पॉइंटवर तैनात आहेत. दर रोज सकाळी ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. लोकगिते आणि प्रबोधन करणारी संतांची पुस्तकं ते वाचतात. त्यांनी सांगितले की, रोज नियमित भजन म्हटल्याशिवाय आपल्याला करमत नाही. त्याचा लाभ काम करताना होतो. चिडचिड होत नाही.

===================

हार्मोनियमवर भजन म्हणून तणावावर नियंत्रण

शहर पोलीस दलातील जिंसी पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक एस. आर. दिलवाले हे उत्तम असे गायक आहेत. त्यांनी पोलिसांच्या अनेक कार्यक्रमात गाणे म्हटले आहेत. नाकाबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना नागरिकांवर कारवाई करावी लागते. लोकांकडून कारवाईला विरोध होतो. अशा वेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि कायद्याची भाषा त्यांना समजावून सांगावी लागते. यातून येणारा तणाव कमी करण्यासाठी दिलवाले हे दररोज सायंकाळी घरी गेल्यावर हार्मोनियम वाजवून भजन म्हणतात. याशिवाय ते कामावर असतानाही गाणे गुणगुणत असतात. शनिवारी रोशनगेट येथे काम करताना त्यांनी उपस्थित सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या आग्रहावरून भजने सादर केली. संगीताची उपासना केल्यामुळे बारा तासानंतरही आपल्याला तणाव जाणवत नाही, असे त्यांनी सांगितले.

=====================

गाणे गुणगुणत राहिल्यावर तणाव दूर पळतो

आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले हवालदार अरुण वाघ हे सध्या कोविड नाकाबंदी बंदोबस्ताकरिता देवळाई चौकात तैनात आहेत. पोलीस दलात दाखल होण्यापूर्वीपासून त्यांना गाण्याची आवड आहे. याविषयी ते म्हणाले की, नाकाबंदीसाठी बारा तास रस्त्यावर उभे राहिल्यानंतर तणाव येतोच; मात्र या तणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी रोज संगीत आराधना करतो. कामावरून घरी गेल्यावर शास्त्रीय संगीताचा सराव करणे, आवडीची गाणे म्हटले की सर्व तणाव गायब होतो. यासोबतच रोज सकाळी फिरायला जातो, याचाही लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

(फोटो आहेत)

चौकट आहे आकडेवारीची

Web Title: Hobbies are cultivated by the police to control stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.