गणोरी ग्रामपंचायतच्या वतीने कुप्रथेची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:04 AM2021-03-29T04:04:51+5:302021-03-29T04:04:51+5:30
रविवारी गणोरी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सरला तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यात होळी पेटवून त्यामध्ये ...
रविवारी गणोरी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सरला तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यात होळी पेटवून त्यामध्ये अस्वच्छता, बालकांचे कुपोषण, बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, साथीचे रोग
आदी विषयांवर पत्रके तयार करून त्यांचे होळीत दहन करण्यात आले, तसेच गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, कोरोनापासून मुक्ती मिळावी, नागरिकांना आर्थिक समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी संतोष तांदळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम, सुदाम गायकवाड, बंडू सपकाळ, पुंडलिक उबाळेे, दादासाहेब जाधव, वंदना शेळके, बेबीताई सपकाळ, मंगल जाधव, मंदा तांदळे, फारुख शेख, अंबादास गायकवाड आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : गणोरी येथे होळीमध्ये कुप्रथेचे दहन करताना सरंपच सरला तांदळे, मनीषा कदम, सुरेश चौधरी.
280321\rauf usman shaik_img-20210328-wa0027_1.jpg
गणोरी येथे होळीमध्ये कुप्रथेचे दहन करताना सरंपच सरला तांदळे, मनीषा कदम, सुरेश चौधरी.