जिल्ह्यात ५२२ जणांना सुटी, ३०९ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:56+5:302021-05-29T04:04:56+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी ३०९ कोरोना बाधितांची भर पडली. जिल्ह्यातील १८ तर इतर जिल्ह्यांतील ८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Holidays for 522 people in the district, 309 corona victims added | जिल्ह्यात ५२२ जणांना सुटी, ३०९ कोरोना बाधितांची भर

जिल्ह्यात ५२२ जणांना सुटी, ३०९ कोरोना बाधितांची भर

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी ३०९ कोरोना बाधितांची भर पडली. जिल्ह्यातील १८ तर इतर जिल्ह्यांतील ८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात शहरातील १६५ आणि ग्रामीण भागातील ३५७ अशा एकूण ५२२ जणांना सुटी देण्यात आल्याने ४ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील रुग्णवाढ दिवसेंदिवस कमी होत असून, ग्रामीण भागातील वाढ अद्याप आटोक्यात आलेली नाही. शहरात ८५ तर २२४ रुग्ण ग्रामीण भागात शुक्रवारी आढळून आले. आजपर्यंत १,३४,५२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १,४२,०५९ झाली आहे. आजपर्यंत ३,१५३ जणांचा मृत्यू झाल्याने ४,३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यात ७९ व्हेंटिलेटरची उपलब्धता झाली आहे.

--

मनपा हद्दीत ८५ रुग्ण

औरंगाबाद १, गारखेडा परिसर १, सातारा परिसर २, बीड बायपास १, नंदनवन कॉलनी १, घाटी १, जवाहरनगर १, देवानगरी १, एन-१३ येथे १, एन-७ येथे १, एन-१२ येथे २, शिवशंकर कॉलनी १, कुशलनगर १, अजबनगर १, तारांगण १, वानखेडे नगर १, एन-९ येथे १, जय भवानीनगर ३, मुकुंद नगर १, मुकुंदवाडी १, एन-१ येथे २, सारा वैभव हर्सूल १, चिकलठाणा एमआयडीसी १, म्हाडा कॉलनी १, हनुमाननगर १, अलोकनगर १, सेवन हिल १, सूतगिरणी चौक १, चौधरी कॉलनी चिकलठाणा १, श्री विनायक कॉलनी १, प्रतापनगर १, साईनगर सिडको १, भावसिंगपुरा १, नक्षत्रवाडी १, कासारी बाजार १, राजेशनगर १, नाईकनगर २, शंभुनगर १, उस्मानपुरा १, सुराणानगर १, सिडको १, जटवाडा रोड १, पंचायत समिती २, समर्थनगर १, जालाननगर १, अन्य ३३

ग्रामीण भागात २२४ रुग्ण

---

वाळूज १, बजाजनगर ३, रांजणगाव शेणपुंजी १, अंधारी, ता. सिल्लोड १, तलवाडा, ता. सिल्लोड १, जटवाडा १, सासुरवादा, ता.सिल्लोड २, टाकळी, ता. खुलताबाद १, शिंदोण १, पैठण २, कन्नड २, भराडी ता. सिल्लोड १, गोसेगाव १, कमलापूर २, पेकडवाडी ३, ग्रामीण १, बोरगाव, ता. औरंगाबाद १, अन्य १९९ रुग्ण आढळून आले.

--

१८ बाधितांचा मृत्यू

घाटी रुग्णालयात २० बाधितांचा मृत्यू झाला, त्यात जिल्ह्यातील १२ तर इतर जिल्ह्यांतील ८ मृतांचा समावेश आहे.

४५ वर्षीय महिला वैजापूर, ६५ वर्षीय पुरुष मुरशिदापूर, ता. गंगापूर, ६५ वर्षीय महिला गारखेडा, ७० वर्षीय पुरुष रहिमाबाद, ६३ वर्षीय महिला भावसिंगुपुरा, ३६ वर्षीय महिला जय भवानीनगर, ४६ वर्षीय महिला वाळुज, ७० वर्षीय महिला वाजोळा, ता. फुलंब्री, ७० वर्षीय पुरुष कारकीन, ता. पैठण, ७३ वर्षीय महिला कटकट गेट, ६७ वर्षीय पुरुष वाघाडी, ७० वर्षीय महिला पळशी, जळगाव जिल्ह्यातील ६३ वर्षीय बाधित पुरुषाचा म्युकरमायकोसिसची सहव्याधी असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे घाटी प्रशासनाने कळवले, तर जिल्हा रुग्णालयात ६५ वर्षीय महिला हिरापूर पैठण, खासगी रुग्णालयात ३४ वर्षीय पुरुष लायगाव, ५७ वर्षीय पुरुष सिल्लोड, ३२ वर्षीय महिला माणिकनगर भवन सिल्लोड, ५९ वर्षीय पुरुष कटकट गेट, ६६ वर्षीय पुरुष पदमपुरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

----

Web Title: Holidays for 522 people in the district, 309 corona victims added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.