पवित्र रमजानचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:04 AM2021-05-12T04:04:42+5:302021-05-12T04:04:42+5:30
सिल्लोड : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान अर्थात ईद-ऊल-फित्रचा सण जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुस्लीम बांधवांनी साध्या ...
सिल्लोड : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान अर्थात ईद-ऊल-फित्रचा सण जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने आणि घरगुती वातावरणात साजरा करावा, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव सार्वजनिकरित्या नमाज अदा करतात. या कालावधीत नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार रमजानचा सण साध्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने साजरा करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी एका वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत पवित्र रमजान महिन्याचा सण साधेपणाने साजरा करावा. बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी घालून दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे. विनाकारण गर्दी करू नये किंवा रस्त्यावर फिरू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करावे, असेही आवाहन सत्तार यांनी केले.