होम सेंटरमुळे विद्यार्थ्यांना सुविधा; मुख्य केंद्रासह आता उपकेंद्रावरही दहावी, बारावीच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 06:23 PM2022-02-04T18:23:36+5:302022-02-04T18:24:55+5:30

SSC/HHC Exam: दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होईल.

Home Center facilitates students; Tenth and twelfth examinations at the main center and now at the sub-center also | होम सेंटरमुळे विद्यार्थ्यांना सुविधा; मुख्य केंद्रासह आता उपकेंद्रावरही दहावी, बारावीच्या परीक्षा

होम सेंटरमुळे विद्यार्थ्यांना सुविधा; मुख्य केंद्रासह आता उपकेंद्रावरही दहावी, बारावीच्या परीक्षा

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद विभागीय मंडळातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ तर, बारावीसाठी ४०८ मुख्य केंद्रे निश्चित करण्यात आली. मात्र, प्रवेशित शाळा, महाविद्यालयातच (होम सेंटर) परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी स्पष्ट केल्याने विभागात मुख्य केंद्रांना संलग्नित शाळा, महाविद्यालयांत दहावीसाठी १८२२, तर बारावीसाठी ८५५ या उपकेंद्रांवरही परीक्षेचे नियोजन सुरू आहे.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान व लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चदरम्यान होईल. दहावी, बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर तर प्रात्यक्षिक ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित होतील. विभागातून दहावीसाठी १ लाख ८१ हजार ६०२ तर, बारावीसाठी १ लाख ६५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. औरंगाबाद विभागीय मंडळातील मुख्य केंद्रे, त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती झाली असून वाढीव केंद्रांची पूर्वतयारी सुरू आहे. संलग्न शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र देण्यात येणार असून त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आहे.

पूर्वनियोजनासाठी जिल्हानिहाय बैठका
परीक्षार्थ्यांसाठी विविध सुविधांच्या तयारीसह परीक्षेच्या नियोजनासंदर्भात जिल्हानिहाय बैठका विभागीय मंडळ घेईल. त्यात सुरुवातीला शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर केंद्रप्रमुखांची बैठक जिल्हानिहाय ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक, हेल्पलाईन
दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी जिल्हानिहाय १-२ समुपदेशक, शंकानिरसनासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात येणार आहे. त्यात शाखा व विभागप्रमुखांचे संपर्क क्रमांक विद्यार्थ्यांना दिले जातील, असे विभागीय सचिव आर. पी. पाटील म्हणाले.

बारावी परीक्षेची जिल्हानिहाय तयारी
जिल्हा - काॅलेज संख्या - केंद्र -उपकेंद्र -विद्यार्थी
औरंगाबाद -४७१ -१५३ -२८७ -५८,३४७
बीड -२९८ -९९ -१७२ -३८,१४३
जालना -२३९ -६९ -१५२ - ३१,३७६
परभणी -२३३- ५५ -१६७ -२४,४७१
हिंगोली -१२० -३२ -७७ -१३,४७२

दहावी परीक्षेची जिल्हानिहाय तयारी
जिल्हा - शाळांची संख्या - केंद्र -उपकेंद्र -विद्यार्थी
औरंगाबाद -९०६ -२२४ -६२१ -६४,६२२
बीड -६५२ -१५६ -४७५ -४१,६७६
जालना -३९७ -१०० -२७३ -३०,४८३
परभणी -४३८- ९३ -३०४ -२८,६९५
हिंगोली -२२१ -५३ -१४९ -१६,१२६

Web Title: Home Center facilitates students; Tenth and twelfth examinations at the main center and now at the sub-center also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.