जिल्हाधिकारी कार्यालयावर होमगार्डस्चा मोर्चा
By Admin | Published: July 28, 2016 12:38 AM2016-07-28T00:38:13+5:302016-07-28T00:56:42+5:30
लातूर : होमगाडर््सवर लादलेल्या जाचक अटी रद्द करून विनाअट कायम करा, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी होमगार्ड्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला़
लातूर : होमगाडर््सवर लादलेल्या जाचक अटी रद्द करून विनाअट कायम करा, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी होमगार्ड्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला़
महाराष्ट्रातील होमगार्ड संघटनेची स्थापना ६ डिसेंबर १९४६ रोजी करण्यात आली आहे़ तेव्हापासून ते आजपर्यंत ७० वर्षे होऊन गेली, तरी महाराष्ट्र शासनाने होमगार्डचा विचार केलेला नाही़ होमगार्ड पोलिसांच्या सोबत अनेक बंदोबस्तात असतात़ मात्र त्यांच्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत नाही़ होमगार्डचा १२ वर्षांचा कालावधी कायमस्वरुपी बंद करावा़, होमगार्डची पुनर्नियुक्ती प्रक्रिया बंद करावी, नवीन भरती रद्द करावी़ होमगार्ड्सला नियमित काम द्यावे़ तसेच होमगार्ड्सला विनाअट कायम करावे आदी मागण्या यावेळी होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आल्या़
या मोर्चात अनंत भालेराव, दिनेश गाडीवान, साळुंके, मारुती वाघमोडे, कौशल्या वाघमारे, प्रियंका कलशेट्टी, विद्या शिंदे आदींची उपस्थिती होती़