होम क्वारंटाईनची संख्या ९२७८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:22+5:302021-03-13T04:07:22+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ९२७८ पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ९२७८ पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक अलगीकरणाचे प्रमाण सध्या शून्यावर आहे.
विभागात १० हजार नागरिक क्वारंटाईन
औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या १० हजार १०४ नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत. यात औरंगाबाद, बीड, उस्मानाबादमध्ये शून्य आकडा आहे. तर परभणी ८९८८, हिंगोली ७०८, नांदेड २१९, लातूर मध्ये १२१ तर जालन्यात ६९ नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
विभागात कन्टेंटमेंट झोनची संख्या वाढली
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कन्टेंटमेंट झोनची संख्या ४२१ वरून ४४९ एवढी झाली आहे. यात परभणीत ६३, हिंगोली- १३, नांदेड- ४२, बीड- ५, लातूर- २६६, उस्मानाबाद- ५६ तर जालन्यात ४ कन्टेंटमेंट झोन करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये एकही कन्टेंटमेंट झोन केलेला नाही.