घरांना जायकवाडी धरणाचा पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:06 AM2017-10-16T01:06:56+5:302017-10-16T01:06:56+5:30
जायकवाडी धरण काठोकाठ भरले असून धरणाच्या लगत असलेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसीत पिंपळवाडी पिराची येथील घरांना या पाण्याचे पाझर फुटल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : जायकवाडी धरण काठोकाठ भरले असून धरणाच्या लगत असलेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसीत पिंपळवाडी पिराची येथील घरांना या पाण्याचे पाझर फुटल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संदीपान भुमरे यांनी या घराची पाहणी करून नागरिकांना उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
जायकवाडी धरण काठोकाठ भरले असून १५२२ फुटाची अंतिम कक्षा ओलांडून पाणी धक्याच्या बाजूला असलेल्या घरांच्या परिसरात जमा झाले आहे. या भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तर ऐरणीवर आला असून घराघरात पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांना घरातील पाणी बाहेर काढावे लागत आहे. धक्का परिसरात येणाºया पाण्यास बांध घालून या पाण्यास मज्जाव केला तर समस्या निकाली निघू शकते, असे यावेळी सरपंच साईनाथ सोलाट यांनी आ. भुमरे यांना सांगितले. त्यांनी सदर ठिकाणची पाहणी करून घराच्या पुनर्वसनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरच मार्ग काढणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, दादा बारे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, सोमनाथ परदेशी, जि.प. सदस्य मनीषा साईनाथ सोलाट, उपसरपंच मुनाफ शेख, भाऊ लबडे, भाऊ लबडे, अनिस शेख, जालिंदर एरंडे, संतोष भिसे, अनिल रोडे आदींंची उपस्थिती होती. पिंपळवाडी हे पुनर्वसित गाव असून ते जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धक्क्यालगत आहे. या परिसरात पावसाचे पाणी, औरंगाबाद महानगरपालिकेच्या लिकेज जलवाहिनीचे पाणी व धरणातील पाझरते पाणी हे एका ठिकाणी साचत असल्यामुळे या ठिकाणच्या नागरीकांचे सध्या मोठे हाल होत आहेत. येथील ५८ घरांचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच साईनाथ सोलाट यांनी आ. भुमरे यांना पाहणीसाठी गावात बोलविले होते.