मध शुद्ध आहे की भेसळयुक्त?
By | Published: December 5, 2020 04:00 AM2020-12-05T04:00:04+5:302020-12-05T04:00:04+5:30
सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण ...
सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी २००३ आणि २००६ मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या १३ मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी १० एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या १० पैकी ३ नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते अशी माहिती दिली आहे.
मध शुद्ध आहे की भेसळयुक्त?; असं करा चेक
- मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाका. जर मध खाली पाण्यात जमा झाले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते. मात्र जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त आहे हे सिद्ध होतं.
- मध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी आयोडीनची गरज आहे. यासाठी मध पाण्यामध्ये मिसळावे लागणार आहे. त्यानंतर या पाण्यात थोडे आयोडीन टाकावे.
- जर या मिश्रणाचा रंग निळा झाला तर यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिसळले आहे हे समोर येतं. यामुळे या मधामध्ये भेसळ असल्याचं सिद्ध होतं. आयोडीनच्या मदतीने हे तपासता येतं.
- तिसऱ्या पद्धतीमध्ये ब्लोटिंग पेपरवर थोडं मध घ्या. जर मध पेपरने शोषूण घेतलं तर या मधामध्ये भेसळ आहे.
- चौथ्या पद्धतीमध्ये एका लाकडाला कापूस गुंडाळावा. त्यानंतर तो मधामध्ये हे बुडवा आणि त्यानंतर त्याला आग लावा. जर मध जळू लागले तर ते शुद्ध आहे.