सन्मान मायलेकींचा...गौरव त्यांच्या नात्याचा
By Admin | Published: May 22, 2016 12:20 AM2016-05-22T00:20:15+5:302016-05-22T00:35:39+5:30
औरंगाबाद : एकमेकींचा भक्कम आधार बनलेल्या माय-लेकींचा सन्मान आज लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘मेरी माँ’ पॉवर्ड बाय भाग्यविजय या कार्यक्रमात झाला.
औरंगाबाद : एकमेकींचा भक्कम आधार बनलेल्या माय-लेकींचा सन्मान आज लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘मेरी माँ’ पॉवर्ड बाय भाग्यविजय या कार्यक्रमात झाला. ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सरर होते. अजूनही अनेक ठिकाणी मुलींना ओझे समजले जाते. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना आजही वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर लोकमतने मुलीच्या जन्मानेच आयुष्याचे सार्थक झाले असे मानणाऱ्या अनेक मातांचा त्यांच्या कन्येसोबत सत्कार केला.
या कार्यक्रमाला वास्तुविशारद विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलच्या संचालिका स्मिता कंचार, अमोल कंचार, तसेच सुप्रसिद्ध गायक धवल चांदवडकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाणीबचतीसाठी ‘लोकमत’ ने सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानाबद्दलही जागृती करण्यात आली. सर्व सखींनी एकत्र येऊन कमीत कमी पाणी वापरण्याबद्दल शपथ घेतली. विजय चाटोरीकर म्हणाले की, आई आणि मुलीचा एकाच व्यासपीठावर सत्कार करण्याचा लोकमतचा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. स्मिता कंचार म्हणाल्या की, आज एकविसाव्या शतकातही स्त्रीभ्रूणहत्या होत असताना, या कार्यक्रमाद्वारे मुलींचा त्यांच्या आईसोबत सन्मान करणे खरोखरच कौतुकास्पद आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये तुलना करणे निरर्थक बनते.
माँ.... मेरी माँ...
आईची महती सांगणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आईचे वर्णन करणारी अनेक नवी-जुनी, हिंदी-मराठी गाणी ऐकताना सखी भावविवश होत होत्या. अरविंद पिंगळे, डॉ. धनश्री सरदेशपांडे यांनीही दर्जेदार गाणी सादर केली. ढोलकीवर जीवन कु लकर्णी, आॅक्टोपॅडवर राहुल जोशी, सिंथेसायझरवर राजेश तायडे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. महेश अचिंलवार यांनी केले.