कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारा सन्मान सोहळा उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:15 PM2019-07-12T19:15:37+5:302019-07-12T19:17:54+5:30

लोकमत वूमन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड : अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव

Honorary celebration of successful women's in 'Lokmat women achievers award' tomorrow | कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारा सन्मान सोहळा उद्या

कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारा सन्मान सोहळा उद्या

googlenewsNext
ठळक मुद्देनिशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती

औरंगाबाद : प्रत्येक नात्याचा पदर हळुवारपणे सांभाळत स्वत:च्या स्वप्नांना मुक्तपणे गवसणी घालण्यासाठी बाहेर पडलेली ‘ती’ आता एक तेजोमयी तारका म्हणून प्रकाशमान झाली आहे. सुरुवातीला थबकत पडणारी तिची पावले आज भक्कमपणे रोवल्या गेली असून अनेकांसाठी ती एक आधारस्तंभ बनली आहे. ‘लोकमत’ने तिचा हा प्रवास जवळून पाहिला, अनुभवला आहे आणि म्हणूनच तिच्या गौरवशाली कर्तृत्वावर समाजमान्यतेची मोहोर उठविण्यासाठी आणि तिचे मनापासून कौतुक करत तिच्या पंखांना बळ देण्यासाठी ‘लोकमत वूमन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड’ या गौरव सोहळ्याचे लोकमत आणि नारायणा आयआयटी, पीएमटी अकॅडमीतर्फे दि. १३ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातच ‘वूमेन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड कॉफीटेबल बुक’चे विमोचन करण्यात येणार आहे.

सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत स्त्रियांची दखल घेणारा, त्यांना एक स्थान, सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा आहे. पंखातील बळ, जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज महिलांनी यशोशिखर गाठले आहे. खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या या वाटेवर त्यांनी स्वत:चा मार्ग तयार केला. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी आणि त्याच वेळी प्रेरणा देणारीही आहे. तिचा हा यशस्वी प्रवास, तिची यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाते. तिच्याकडे बघून अनेकींना नवी आशा मिळते. त्यामुळेच तर तिचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक कौतुक सोहळा. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच असून, सन्माननीय अतिथींनी दु. ३.३० वा. कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले. 

कार्यक्रमातील सत्कारमूर्ती
अलकनंदा मालाणी, अलका कोरडे, अनघा काळे, अनघा तातेड, कल्पना बनसोड, बिंद ओमंगलथू, चैताली गांधी, दीपा पटारे, देवयानी डोणगावकर, डॉ. सुनीता शेळके, डॉ. भावना टाकळकर, गीता आचार्य, हर्षा इंगळे, जयश्री अग्रवाल, जयश्री सोमासे, ज्योती चिलात्रे, कांचन आणि सुलोचना लिंगायत, मानसी वाडकर, नताशा झरीन व गौरी मिराशी, नीलम खेमनार, नीता नालमवार, पद्मा तापडिया, पार्वती फुंदे, प्राजक्ता कुमार, प्रीती भानुशाली, प्रीती सोनवणे, पूजा देशपांडे, रश्मी खिंवसरा, रेखा गोरे, शीतल रुद्रवार, श्रुती काटे, सोनल लदनिया, सुप्रिया बडवे, उज्ज्वला सोनवणे, उषा नागपाल, वर्षा सुर्वे, वर्षा ठाकूर, वृषाली चाटोरीकर. 

निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री निशिगंधा वाड. बालकलाकार म्हणून निशिगंधा यांनी अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून पुढे सलग ९ वर्षे त्यांनी ती मिळविली. ‘भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका’ या विषयासाठी मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. प्रदान केली आहे. सांस्कृतिक अंगासोबतच निशिगंधा यांचे सामाजिक भानही प्रगल्भ असून महिलांचे अनेक प्रश्नही त्यांनी विविध व्यासपीठांवरून सक्षमपणे मांडले आहेत, असे हे बहुगुणी व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सत्कारमूर्तींना त्यांच्याच हस्ते गौरविण्यात येईल.

Web Title: Honorary celebration of successful women's in 'Lokmat women achievers award' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.