पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

By Admin | Published: July 29, 2015 12:15 AM2015-07-29T00:15:36+5:302015-07-29T00:49:54+5:30

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत

The hope of the crops rises; Finishing the care of the fungus | पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

googlenewsNext

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत. हिरवा चारा तर लांबच परंतु कडबा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे. आता जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
खरिपातील पिकांची लागवड केल्यापासून पावसाने ओढ दिल्याने सर्व पिके धोक्यात आली आहेत. पावसाने घोर निराशा केल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाऱ्याअभावी व उन्हापासून बचाव होण्याच्या हेतूने जनावरे दुपारच्या वेळी दावणीला बांधली जायची. मात्र यंदा भरपावसाळ्यातही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत.
अद्यापर्यंत एकही दमदार पाऊस झाला नसल्याने हिरव्या चारा तर उगवलाच नाही. चाऱ्याचा हातचा शिल्लक असावा म्हणून बाजारपेठात चाऱ्याची आवक घटली आहे. वाळलेल्या चाऱ्यातही कडब्याशिवाय पर्यायच नाही. जिल्ह्यातील कडब्याचा साठा शुन्य टक्के झाल्याने इतर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे.
सध्या पावसाचे वातावरणही नसल्याने एक दिवसाआड चाऱ्याचे दर वाढत आहेत. गत महिन्यात १५०० शेकड्यावरचा कडबा सोमवारी २८०० रुपयांवर पोहचला होता. आर्थिक बाजू खालावल्याने शेतकऱ्यांना वाळलेला कडबाही खरेदी करणे अवघड झाले आहे. पावसाच्या आशेवर तात्पूरते भागेल या भावनेने शेतकरी आठ दिवस पुरेल एवढाच कडबा खरेदी करीत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने त्याच्या बाजारपेठा बंद पडल्या आहेत. चाराटंचाईचा परिणाम दुग्धव्यवसायावरही झाला असून दुध संकलन निम्म्यावर आले आहे.
उत्पादनाचे नुकसान व जोड व्यवसायही धोक्यात आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांची आठवडी बाजारात गर्दी होत आहे. मात्र कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना जितराब सांभाळण्याशिवाय पर्यायच नाही. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पावसाने दगाबाजी केली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात चाराछावण्या व चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. चाऱ्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The hope of the crops rises; Finishing the care of the fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.