विविध मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:04 AM2021-05-25T04:04:31+5:302021-05-25T04:04:31+5:30
आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडिक्लेम योजना लागू करा, ...
आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडिक्लेम योजना लागू करा, श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करण्यात यावे, तसेच कोरोनात कामासाठी आशा व गटप्रवर्तक यांना प्रतिदिन तीनशे रुपये मोबदला म्हणून द्यावा. मास्क, सॉनिटायझर नियमित द्यावे, अशी मागणी जिल्हा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आली.
संपात जिल्ह्यातील २ हजार २३३ आशा व १०० गटप्रवर्तकांनी सहभाग नोंदवत काम बंद आंदोलन केले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन दिले. युनियनचे अध्यक्ष दामोदर मानकापे, जनरल सेक्रेटरी मंगला ठोंबरे, पुष्पा शिरसाट, मीरा जाटवे, पुष्पा पैठणे, संगीता जोशी, शोभा काळे, पुष्पा काळे, सुनीता दाभाडे, सुनीता गंगावणे, मंगला मोरे, आशिया शहा आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.