आष्टीत मोर्चा; मांजरसुंब्यात रास्ता रोको
By Admin | Published: July 18, 2016 12:38 AM2016-07-18T00:38:54+5:302016-07-18T01:09:59+5:30
बीड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद रविवारी जिल्ह्यात उमटले.
बीड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद रविवारी जिल्ह्यात उमटले. तालुक्यातील मांजरसुंबा येथे रास्ता रोको तर आष्टीत मूक मोर्चाद्वारे नागरिकांनी निषेध नोंदवला. दरम्यान, सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मांजरसुंबा येथे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी स्वप्नील गलधर, डॉ. गणेश ढवळे, मनोज जरांगे, हनुमान मुळीक, दीपक जगदाळे, ऋषीकेश सुरवसे, नाना महाराज कदम आदी उपस्थित होते. पीडित मुलीच्या कुटुबियांचे पुनर्वसन करावे, आरोपींवर कठोर शासन करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.
आष्टी येथे छत्रपती कॉम्पलेक्स परिसरात विविध सामाजिक संघटनांची सकाळी बैठक झाली. त्यानंतर दुपारी काळ्या फिती लावून पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराज संकूल, साठे चौक, कमान वेस, डॉ. आंबेडकर चौक मार्गे मोर्चा ठाण्यात पोहोचला. यावेळी निरीक्षक एच. जी. गवळी यांना निवेदन देण्यात आले. रमजान तांबोळी, संजय मेहेर, महेश शिंदे, डॉ. जालिंदर वांढरे, सागर तेरकर, संदीप खाकाळ, हिरालाल बलदोटा, बा.म. पवार, कल्याण तळेकर, संजय पवार, गणेश काकडे, श्रीपाद बळे, अनिल जगदाळे, राहुल मुथा, बाळासाहेब थोरवे, यदू शहाणे, दिलीप ुसुरवसे, अंकुश खोटे, मुकुंद लगड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
अंबाजोगाईत सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला. सोमवारी व्यापारपेठ, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय निषेध बैठकीत झाला.
बीडमध्ये विश्रामगृहात संघटनांचे पदाधिकारी एकवटले. बैठकीत घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी अशोक हिंगे, प्रा. सचिन उबाळे, अॅड. प्रकाश कवठेकर, किशोर पिंगळे, विनोद इंगोले, विजय लव्हाळे, अशोक ठाकरे, शरद चव्हाण, रमेश चव्हाण, सुनील सुरवसे, अॅड. महेश धांडे, कुंदा काळे, प्रतिभा गायकवाड, राहुल वाईकर, युवराज जगताप, अशोक सुखवसे, दीपक आमटे, सागर बहीर उपस्थित होते.
..तर आमदारांना बांगड्यांचा आहेर
राज्य अधिवेशनात कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणाचा मुद्दा उपस्थित न करणाऱ्या आमदारांना बांगड्यांचा आहेर देण्यात येईल, असा इशारा या बैठकीत अशोक हिंगे, अॅड. प्रकाश कवठेकर यांनी दिला. (प्रतिनिधी)