भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला
By संतोष हिरेमठ | Updated: January 17, 2025 11:53 IST2025-01-17T11:52:19+5:302025-01-17T11:53:25+5:30
ती व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढेपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला
छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडल्याने एक जण गंभीर भाजल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगररेल्वेस्टेशनवर घडली. त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा प्रकार लक्षात येताच लोहमार्ग पोलिस संजय राऊत, रामभाऊ मोहेकर, वैभव सपकाळ, सुनील घुगे, क्षीरसागर, उमेश गायकवाड यांच्यासह रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. इलेक्ट्रिक लाईनला वीजपुरवठा बंद करून जखमी व्यक्तीला इंजिनवरून खाली उतरविण्यात आले. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ती व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढेपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून थेट इलेक्ट्रिक लाइनला पकडल्याने एकजण गंभीर भाजला; छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील घटना #chhatrapatisambhajinagar#marathwadapic.twitter.com/SSvlYFLcv6
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) January 17, 2025
दरम्यान, डेक्कन ओडिसी शाही रेल्वेची आठवी ट्रिप आज ५० पर्यटकांसह छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली. हे पर्यटक ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि सिंगापूर येथील आहेत. वेरूळ, दौलताबाद दौऱ्यासाठी दुपारी दीड वाजता प्रवासी रवाना होतील.