वाळूचे टिप्पर आणि काळीपिवळी जीपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 11:23 PM2021-08-06T23:23:50+5:302021-08-06T23:26:00+5:30

औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

horrific accidents in sand truck and Jeep; 3 seriously injured | वाळूचे टिप्पर आणि काळीपिवळी जीपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

वाळूचे टिप्पर आणि काळीपिवळी जीपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

googlenewsNext

सिल्लोड: वाळू भरण्यासाठी जाणारे टिप्पर व काळीपिवळी टॅक्सीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.   
    
शेख सलीम शेख रहीम वय 40 स्नेहनगर, सय्यद कासिम सय्यद लियाकत वय 36 ईदगाह नगर सिल्लोड व अन्य एक अनोळखी अशी जखमींची नावे आहेत. रात्री १०:०० वाजेपर्यंत सुद्धा तेथे पोलीस हजर नव्हते.

औरंगाबादहून सिल्लोडकडे येणारी काळी -पिवळी टॅक्सी (क्रमांक एम एच २०डी एफ ००९२) आणि के-हाळा येथील पूर्णा पात्रात वाळू भरण्यासाठी भरधाव वेगाने जाणारा टिप्पर (क्रमांक एम एच २१ एक्स ३९५१)  यांच्यात रात्री ८ वाजेच्या सुमारास चिंचखेडा येथे हॉटेल फोरसिझन समोर जोरदार धडक झाली.  भीषण अपघात दोन्ही वाहनांनी तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या बाजूला पडली होती. दोन्ही वाहनांचे दोन तुकडे होऊन इतरत्र पडले होते. महामार्गावर काचेचा सडा पडलेला होता.

Web Title: horrific accidents in sand truck and Jeep; 3 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.