कृषी विभागाचे वरातीमागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:40 AM2017-09-29T00:40:37+5:302017-09-29T00:40:37+5:30
शासनाकडून खत वितरणात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धत सुरू केली़ जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात खरीपासाठी सर्वाधिक खत विक्री होते़ परंतु, या कालावधीत ई-पॉस न वापरता खत विक्री झाली़ सप्टेंबर महिन्यात या पद्धतीचा वापर न करणाºया दुकानदारांवर कारवाईचा बडगा म्हणजे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार जि़ प़ चा कृषी विभाग करीत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शासनाकडून खत वितरणात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धत सुरू केली़ जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात खरीपासाठी सर्वाधिक खत विक्री होते़ परंतु, या कालावधीत ई-पॉस न वापरता खत विक्री झाली़ सप्टेंबर महिन्यात या पद्धतीचा वापर न करणाºया दुकानदारांवर कारवाईचा बडगा म्हणजे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार जि़ प़ चा कृषी विभाग करीत आहे़
खत वाटपात पारदर्शकता यावी, अनुदानीत खत लाभार्थी शेतकºयापर्यंत योग्य पद्धतीने पोहचावे यासाठी शासनाकडून खत वितरणात थेट लाभ हस्तांकरण (डीबीटी) पद्धत सुरू केली आहे़ सुरूवातीपासूनच ई- पॉसचा वापरासाठी कृषी विभागाने प्रशासकीय पद्धतीने दुकानदारांना आवाहन केले़ ई-पॉस मशीन वापर आणि हाताळण्यासाठी मार्चमध्ये कृषी आयुक्तालयाकडून खत विके्रत्यांना प्रशिक्षण देण्यात आले़ जिल्ह्यात जवळपास ११०० मशीनची गरज असताना केवळ ५०४ ई-पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या़ त्यातही इंटरनेट आणि इतर तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करीत दुकानदारांनी या मशीनचा वापर केला नाही़ बहुतांश खत विके्रत्यांनी जुन्या पद्धतीनेच खत विक्री केली़ यामध्ये शेतकºयांचे आणि शासनाचेही नुकसान झाले आहे़ यासंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा डीबीटीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ४ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता बैठक आयोजित केली आहे़