बागायती शेतीची नोंद कोरडवाहू; निषेधार्थ धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:30 AM2017-10-24T00:30:53+5:302017-10-24T00:30:53+5:30

समृद्धी महामार्गात संपादित करण्यात येणा-या बागायती शेतीची नोंद सर्वेक्षणामध्ये कोरडवाहू करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले

Horticultural farming records dry land; Protest movement | बागायती शेतीची नोंद कोरडवाहू; निषेधार्थ धरणे आंदोलन

बागायती शेतीची नोंद कोरडवाहू; निषेधार्थ धरणे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समृद्धी महामार्गात संपादित करण्यात येणा-या बागायती शेतीची नोंद सर्वेक्षणामध्ये कोरडवाहू करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले व नंतर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतजमिनी संपादित करण्यात येत असून, त्यासाठी केल्या जाणा-या सर्वेक्षणात ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे, अशा शेतीची नोंद केवळ तीन वर्षांचा पेरा नाही या कारणास्तव कोरडवाहू अशी करण्यात येत आहे.
ही बाब अन्यायकारक आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी बागायती शेती करू शकले नाहीत; परंतु त्या बागायती आहेतच. विहीर, पाइपलाइन यासाठी या शेतक-यांनी कर्जसुद्धा घेतलेले आहे.
सलग तीन वर्षे बागायती केलेली असणे हा निकष न ठेवता वस्तुस्थितीवर आधारित ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे, त्या बाबींची नोंद घेऊन या शेतीची बागायती अशी नोंद घेण्यात आली पाहिजे.
या धरणे आंदोलनात घोडेगाव, गोळवाडी, दहेगाव, पालखेड, जांबरगाव या गावचे शेतकरी सहभागी झाले होते.
विलास चव्हाण, शैलेश सुरासे, मयूर वेरुळकर, भाऊसाहेब राऊत, श्रीराम साळुंके, भाऊसाहेब शिंदे, आबासाहेब उगले, संताराम उगले, नानासाहेब रोठे, अद्दूसेठ बागवान, अण्णा उगले, नारायण उगले, कृष्णा पवार, दत्तात्रय पवार, पारसनाथ कोल्हे, नंदकुमार जाधव, योगेश उगले, सीताराम उगले, राजू शेळके, मधुकर सदावर्ते, नामदेव गवळी, शेख अल्ताफ, अब्दुल लतीफ, अश्फाक अहमद बागवान आदींसह कार्यकर्ते धरणे आंदोलनात उतरले होते.

Web Title: Horticultural farming records dry land; Protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.