उमरी तालुक्यात फळबागांचे नुकसान
By Admin | Published: March 1, 2016 11:41 PM2016-03-01T23:41:43+5:302016-03-01T23:54:36+5:30
उमरी: तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ सोमवारी सायंकाळी सुरू झालेला वादळी वाऱ्यासह पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता़
उमरी: तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़
सोमवारी सायंकाळी सुरू झालेला वादळी वाऱ्यासह पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता़ तालुक्यात उमरी स्थानिकला १२ मि़मी़, बोळेगाव ६ मि़मी़, सिंधी १८ मि़मी़ यानुसार सरासरी १२ मि़मी़ पाऊस तालुक्यात झाल्याची नोंद आहे़ वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे पडली़ तसेच शेतातील निवारा व झाडे उन्मळून गेली़ यातच बोळसा गं़प़ येथे एक म्हैस मरण पावली़ मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी घटनास्थळाची पंचनामा केला़ तहसीलदार दामोधर जाधव यांनी ही माहिती दिली़
तळेगाव येथे श्रीकांत देशमुख, गणेश जाधव, अफसर पटेल, किशनराव खदगाये, मनोज कुलकर्णी आदी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या बागेतील आंबा, मोसंबी, लिंबू आदी फळबागाचे मोठे नुकसान झाले़ आंब्याचा मोहोर तसेच फळे पूर्णत: नष्ट झाली़ लिंबू व मोसंबीच्या झाडाला तर एकही फळ राहिले नाही़ तालुक्यातील नागठाणा, सिंधी, शिरूर, करकाळा, बळेगाव, जामगाव आदी शिवारात फळबागा नष्ट झालया़ दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांनी कशीतरी फळबाग वाढविली़ तीही सोमवारच्या वादळी वाऱ्याने पूर्णत: नष्ट केली़ यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे़ शासनाने यासंदर्भात सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़(वार्ताहर)