औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील रुग्णालय रेंगाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:36 AM2018-05-18T00:36:28+5:302018-05-18T00:38:36+5:30

मॉडेल रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीमध्ये प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जुन्या इमारतीतील एका कक्षाचे रुग्णालयात रुपांतर करण्यात आले.

The hospital at Aurangabad railway station is stricken | औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील रुग्णालय रेंगाळले

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील रुग्णालय रेंगाळले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीमध्ये प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जुन्या इमारतीतील एका कक्षाचे रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. आवश्यक साहित्यही दाखल झाले. परंतु दोन महिन्यांपासून हे रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ प्रवासी आणि रेल्वे कर्मचा-यांवर येत आहे.
या रुग्णालयात प्रवासी, रेल्वे कर्मचाºयांसाठी बाह्यरुग्ण विभागाद्वारे रुग्णसेवा दिली जाणार आहे. त्यामुळे ऐन प्रवासात उपचाराची आवश्यकता भासणाºयांना दिलासा मिळणार आहे. परंतु हे रुग्णालय रुग्णसेवेत कधी दाखल होते, याकडे डोळे लावून बसण्याची वेळ येत आहे. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागासोबत चर्चा आणि आवश्यक प्रक्रियाही पूर्ण झाली. या रुग्णालयासाठी रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीमधील बुकिंग कक्षाची जागा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी धूत हॉस्पिटलकडून डॉक्टर्स, नर्स यासह आवश्यक वैद्यकीय सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली.
१ मार्चपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली; परंतु प्रत्यक्षात अद्यापही रुग्णालय सुरू झालेले नाही. धूत हॉस्पिटलचे डॉ. हिमांशू गुप्ता म्हणाले, आमच्याकडून संपूर्ण तयारी झालेली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.
अधिकारी म्हणतात...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांच्याशी संपर्क साधला असता रेल्वेस्टेशनवरील रुग्णालय लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The hospital at Aurangabad railway station is stricken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.