कंत्राटी डॉक्टरांवरच रुग्णालयाचा कारभार
By Admin | Published: June 29, 2014 11:43 PM2014-06-29T23:43:40+5:302014-06-30T00:37:05+5:30
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हा कंत्राटी डॉक्टरांवरच सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे.
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हा कंत्राटी डॉक्टरांवरच सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी होते. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आठ दिवसांपूर्वी झाल्या. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन कंत्राटी डॉक्टरांवरच रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. या रुग्णालयात दररोज हजारो गोरगरिब रुग्ण उपचासाठी येतात. मात्र रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने नाराजगी व्यक्त होत आहे. रुग्णालयातील रिक्त असलेल्या डॉक्टरांची पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)
बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे डॉक्टर व परिचारिकेवर कोणाचाच वचक राहिला नाही. त्यामुळे रुग्णांना सुविधा मिळणे अवघड झाले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.