समर्थक आमदारांना खुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जावयासारखा पाहुणचार: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Published: August 17, 2023 06:26 PM2023-08-17T18:26:06+5:302023-08-17T18:27:05+5:30

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवेंची मिश्किल टिका

Hospitality from Chief Minister Eknath Shinde just to keep MLAs happy: Ambadas Danve | समर्थक आमदारांना खुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जावयासारखा पाहुणचार: अंबादास दानवे

समर्थक आमदारांना खुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जावयासारखा पाहुणचार: अंबादास दानवे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: आमदारांना खूश ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भोजन दिले आहेत. कालपर्यंत महिनाभर अधिक मासामध्ये ज्या पध्दतीने जावयांना धोंड्याचा पाहुणचार करण्यात आला, तसाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांना जावयाप्रमाणे धोंड्याचे जेवण दिले असावे,अशी मिश्किल टिका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. 

छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक येथील संपर्क कार्यालयात  पत्रकारांशी पत्रकारांशी संवाद साधताना आ.दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत असूनही त्यांना आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजन द्यावे लागते. ज्यांचे हात दगडाखाली असतो, त्यांना अशा प्रकारे आमदारांना जावयासारखी वागणूक द्यावी लागते. कारण दगडाखालचा हात काढला तर तोच दगड अंगावर पडू शकतो,अशी भिती असते.शहरातील गुन्हेगारीविषयी बोलताना ते म्हणाले की, शहरातील गुन्हेगार मोकाट सुटले आहे. खुलेआम गुन्हेगार पिस्टल घेऊन फिरतात. ही बाब पोलिसांना माहिती नसते असे नाही. परवा एका सोनाचे सोनं चोरीला गेले किती आणि जप्त किती केले, याचे गणित जुळत नाही. एक डिसीपी चारचौघांना उडवतो,मात्र त्याच्यावर कारवाई होत नाही. शहर पोलीस विभाग वसूलीत गुंतल्याचे दिसते. याविषयी कितीती तक्रारी करा पण कारवाई होत नसल्याचे जानवते.

अधिकाऱ्यांनी खाबूगिरी  कमी केले तर कोणत्याही दौऱ्याची गरज नाही
महाराष्ट्रातील राज्यातील खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांचे पथक अभ्यास दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडच्यादौऱ्यावर गेले आहे.  महाराष्ट्र आणि या दोन्ही देशातील हवामान सारखे नाही. यामुळे तेथील रस्त्याचा नियम महाराष्ट्रातील रस्त्यासाठी लागू होत नाही. केवळ अधिकाऱ्यांना पाठवायचे म्हणून पाठवलेले दिसते.  अधिकाऱ्यांनी खाबूगिरी कमी केली तर सर्व रस्ते व्यवस्थित होती. 

आ.रोहित पवार यांनी घेतली दानवेंची भेट
दोन दिवसांपासून शहराच्या दौऱ्यावर असलेले कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी गुरूवारी सकाळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांची त्यांच्या क्रांतीचौक येथील संपर्क कार्यालया भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. चंद्रकांत दानवे  तसेच दोन्ही पक्षाचे स्थानिक पदाधिकारी होते.यावेळी  विरोधीपक्षनेते पदावर विराजमान झाल्यापासून आ. दानवे हे राज्यात उत्तम कामगिरी करीत असल्याचे आ.राेहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

Web Title: Hospitality from Chief Minister Eknath Shinde just to keep MLAs happy: Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.