घरकुल अनुदानासाठी अधिका-याच्या दालनात टाकले दगड
By Admin | Published: July 11, 2017 02:01 PM2017-07-11T14:01:00+5:302017-07-11T14:01:36+5:30
" रमाई " घरकुलाचे वाढीव अनुदान मिळावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गटविकास अधिका-यांच्या दालनांत दगड टाकले.
ऑनलाईन लोकमत
बीड :पाटोदा येथे घरकुलाचे वाढीव अनुदान मिळावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत सोमवारी (दि. १०) दुपारी गटविकास अधिका-यांच्या दालनांत दगड टाकले.
शासनाने इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर " रमाई " आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीघरकुल १ लाख रु देण्याचा निर्णय तिन वर्षांपूर्वी घेतला आहे. तत्पूर्वी प्रतीघरकुल ७० हजार रु देण्यात येत होते . हा निर्णय होऊन ३ वर्ष उलटून गेल्यानंतरही प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे लाभार्थि या वाढीव अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान तातडीने द्यावे यासाठी लोकजनशक्ती पार्टीतर्फे अनोखे आंदोलन करत गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात दगड आणून टाकले.
गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करत पंचायत समितीचे लेखाअधिकारी निवृत्त झाल्याने हा निधी प्रलंबित आहे अशी माहिती दिली. नवे लेखाअधिकारी रुजू झाल्यानंतर धनादेश देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.