निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:19 AM2018-07-19T01:19:22+5:302018-07-19T01:19:47+5:30
आकाशवाणीमागील मित्रनगर येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिका-यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि किमती साड्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आकाशवाणीमागील मित्रनगर येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिका-यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि किमती साड्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी सांगितले की, मित्रनगर येथे भगवान लांडगे हे निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी पत्नीसह राहतात. ११ जुलै रोजी ते पत्नीसह पुणे येथे राहणा-या मुलांकडे गेले होते, तेव्हापासून त्यांच्या बंगल्याला कुलूप होते. ही संधी साधून चोरटे शेजारच्या बंगल्याच्या गच्चीवरून लांडगे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर गेले. गच्चीवरील जिन्याच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी आतील लोखंडी ग्रीलचे दोन कुलूप तोडून आत प्रवेश केला. बंगल्यात सीसीटीव्ही असल्याची माहिती चोरट्यांना होती, त्यामुळे चोरट्यांनी सर्वप्रथम जिन्यातील कॅमे-याचे वायर तोडले. त्यानंतर ते खालच्या मजल्यावर आले. तेथील दुसरा कॅमेरा त्यांनी काढून घेतला. चोरट्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या बेडरूममध्ये जाऊन क पाट उघडून त्यातील चांदीच्या वस्तू आणि सुमारे २० ते २२ हजारांची रोकड उचलली. त्यानंतर चोरटे तळमजल्यावरील बेडरूममध्ये गेले. तेथील कपाटातील किमती साड्या आणि किरकोळ रक्कम घेऊन आल्या मार्गाने पसार झाले.
बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लांडगे परिवार गावाहून घरी आला, तेव्हा त्यांना समोरच्या हॉलमध्ये छत्री पडलेली दिसली. ती छत्री त्यांच्या मालकीची नव्हती. गावी जाताना बंद केलेले दिवे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास
आले.
चोरट्यांनी घर फोडल्याचा संशय त्यांना आल्यानंतर लांडगे दाम्पत्याने बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता कपाटातील सर्व साहित्य आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तातडीने जवाहरनगर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञालाही घटनास्थळी पाचारण केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.