१६ डिसेंबरपर्यंत घरोघरी सर्वेक्षण

By | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:08+5:302020-12-02T04:08:08+5:30

सुरक्षित अंतरासाठी केंद्रांवर मार्किंग औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर मतदारांत सुरक्षित अंतर राहण्यासाठी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडलेल्या प्रत्येक ...

Household survey till December 16 | १६ डिसेंबरपर्यंत घरोघरी सर्वेक्षण

१६ डिसेंबरपर्यंत घरोघरी सर्वेक्षण

googlenewsNext

सुरक्षित अंतरासाठी केंद्रांवर मार्किंग

औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर मतदारांत सुरक्षित अंतर राहण्यासाठी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडलेल्या प्रत्येक केंद्रांवर दोन मतदारांमध्ये किमान सहा फूट अंतराचे मार्किंग करण्यात येणार आहे. त्याचे काम रविवारी आणि सोमवारी दिवसभर सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुरुष, महिला तसेच वृद्ध व अपंग यांच्यासाठी स्वतंत्र तीन रांगा मतदान केंद्रावर असतील.

वाळू ठेक्यांसाठी २० ठिकाणचे प्रस्ताव

औरंगाबाद: शासनाच्या नवीन जिल्ह्यात लिलावासाठी निवडलेल्या २० वाळूठेक्यांचे प्रस्ताव पर्यावरण समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आले. हे प्रस्ताव राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. सिल्लोड तालुक्यातील ८, गंगापूर १, कन्नड ४, वैजापूर ६ तर फुलंब्री तालुक्यातील एक असे २० वाळूठेके निवडले आहेत.

Web Title: Household survey till December 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.