१० वीनंतरचे करिअर कसे साकारायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:02 AM2021-04-20T04:02:06+5:302021-04-20T04:02:06+5:30
दि. २१ एप्रिल रोजी सायं. ७ ते ८.१५ या वेळेत हे वेबिनार होईल. ‘फक्त स्वप्ने पाहू नका, ती साकारही ...
दि. २१ एप्रिल रोजी सायं. ७ ते ८.१५ या वेळेत हे वेबिनार होईल. ‘फक्त स्वप्ने पाहू नका, ती साकारही करा’, याबाबत डीएफसीचे संचालक गोविंद काबरा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, ही स्वप्ने साकार कशी करायची, याचा मार्गही दाखविणार आहेत.
करिअरची ऐनवेळी माहिती घेऊन निर्णय घेणे कठीण होते. त्यामुळे १० वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे वेबिनार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आयआयटी, नीट, केव्हीपीवाय, सीईटी या परीक्षांसोबतच फार्मसी, एनडीए, आर्किटेक्चर या क्षेत्रांसाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा, तसेच कॉमर्स, कला, यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या प्रशासकीय सेवा, लॉ, बँकिंग, एमबीए, सीए, सीएस, सीएमए, अध्यापन, ॲक्चुरिअल सायन्स, या क्षेत्रांमध्येही यशाचे उत्तुंग शिखर कसे गाठता येते आणि अवघ्या २२-२३ व्या वर्षीच करिअरला सुरुवात कशी होऊ शकते, याविषयी या वेबिनारमध्ये अचूक माहिती मिळेल.
चौकट :
- अधिक माहितीसाठी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
चौकट :
वेबिनारची वैशिष्ट्ये-
- १० वीच्या परीक्षेची वाट न पाहता ११ वीची तयारी कशी आणि केव्हा सुरू करायची, याविषयी मार्गदर्शन.
- उज्ज्वल भवितव्यासाठी नावीन्यपूर्ण तसेच अद्वितीय करिअर संधी.
- डीएफसीच्या साथीने करिअरचे योग्य नियोजन आणि तयारी
सूचना
१. कॅम्पस क्लब आणि डीएफसीचा लोगो घेणे.
२. वेबिनारसाठी क्यूआर कोड दिलेला आहे.